Mumbai news – सीएसएमटी स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी; डॉग स्क्वॉड, बीडीडीएसकडून 3 तास कसून तपासणी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक बॉम्ब उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सीएसएमटी स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. यामुळे एकच खळबळ उडाली. श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व निकामी करणाऱ्या पथकाने तब्बल तीन तास रेल्वे स्थानक आणि परिसराची कसून तपासणी केली. आयएएनएसने मुंबई रेल्वे पोलिसांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.
14 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांना बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरक्षा कडक करण्यात आली. संध्याकाळी 6:50 च्या सुमारास एका कॉलरने डायल 112 द्वारे पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली. श्वानपथक आणि बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (BDDS) पथकांनी स्टेशन परिसराची व्यापक झडती घेतली. रात्री 9:30 च्या सुमारास शोध मोहीम संपली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सामग्री आढळली नाही. पोलिस सध्या कॉलरचा शोध घेत आहेत: मुंबई रेल्वे पोलिस
— IANS (@ians_india) 15 नोव्हेंबर 2026
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील महापौर कार्यालय, न्यायालय, बँका, शाळांसह अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, तसेच दिलजित सिंग डोसांज याचा कॉन्सर्ट बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असतानाच शनिवारी सायंकाळी एक धमकीचा फोन आला. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.
सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी एका अज्ञात व्यक्तीने डायल 112 द्वारे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. प्रचंड वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. श्वान पथक, बॉम्ब शोधक व निकामी करणारे पथक (बीडीडीएस) यांनी रेल्वे स्थानक परिसरात कसून तपासणी केली.
रात्री 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही शोधमोहीम पूर्ण झाली. शोधमोहिमेदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ सापडले नाहीत. सध्या पोलीस संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत, अशी माहिती मुंबई रेल्वे पोलिसांनी दिली आहे. तसेच बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.
Comments are closed.