बीएसएफने पठाणकोटमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून केले ठार
वृत्तसंस्था, पठाणकोट
पंजाबमधील पठाणकोट येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला आहे. पाकिस्तानच्या बाजूने भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफच्या जवानांनी गोळीबार करून ठार केले. पहाडीपूर सीमा चौकीजवळ (बीओपी) ही घटना घडली. गुऊवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुऊवारी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास पठाणकोटमधील उझ नदीच्या किनाऱ्यावरील पहाडपूर सीमा चौकी परिसरात ही घटना घडली. पाकिस्तानच्या दिशेने एक व्यक्ती भारतीय सीमेकडे येताना बीएसएफच्या जवानांना दिसली.
जवानांनी संबंधित व्यक्तीला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, वारंवार सूचना देऊनही त्याने इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि आंतरराष्ट्रीय सीमेकडे पुढे जाण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी गोळीबार केला. या कारवाईत घुसखोराचा मृत्यू झाला.
सीमावर्ती भागात शोधमोहीम सुरू
घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात सतर्कता वाढवली आहे. घुसखोर एकटाच आला होता की त्याच्यासोबत अन्य व्यक्तीही होत्या, याचा तपास केला जात आहे. पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून घटनास्थळी तपास सुरू असून, आवश्यक पुरावे गोळा करण्याचे कामही सुरू आहे.
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर सीमेवर कडक पहारा
हिवाळ्यात धुके आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेऊन घुसखोरीचे प्रयत्न होण्याची शक्मयता लक्षात घेता सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांकडून संयुक्त शोधमोहीम राबवली जात आहे. तसेच सीमेलगतच्या भागांमध्ये गस्त आणि तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.
Comments are closed.