आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं… एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्याती
बुलढाणा गुन्हा: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात मुलाने स्वतःच्या आई-वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून अखेर स्वतःचाही जीव संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय . या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच दिवशी संपूर्ण कुटुंब संपल्याने गावात खळबळ उडाली आहे.
Crime News: काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव डुकरे येथील विशाल सुभाष डुकरे (वय 42) या व्यक्तीने गुरुवारी सकाळच्या सुमारास आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले. यात वडील सुभाष डुकरे (वय ७५) आणि आई लता डुकरे (वय 65) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आई-वडिलांची हत्या केल्यानंतर विशाल डुकरेंने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही भीषण घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलेश तांबे, चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घराला संपूर्णपणे सील करण्यात आले असून पंचनामा सुरू आहे. तिन्ही मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी जिल्हा उपरुग्णालय, चिखली येथे हलविण्यात आले आहे. या हत्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून शेजाऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.
या घटनेनंतर सावरगाव डुकरे गावात शोककळा पसरली आहे. एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांची हत्या करून पुराने स्वतःचाही जीव संपवल्याचा प्रकार समोर आल्याने गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, फॉरेन्सिक तपासणी आणि मृतदेहांच्या पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच हत्येमागचं खरं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी रायगडमधेही असाच प्रकार घडला होता.
पोराने वृध्द आईबापाला संपवलं
म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. वृद्ध दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यूमागील रहस्य अखेर उलगडलं असून, हे प्रकरण थेट कौटुंबिक वैरातून उभं राहिल्याचं समोर आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या वृद्ध दांपत्याची हत्या कुणी परका नाही, तर त्यांच्या स्वतःच्या दोन मुलांनीच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. (Crime news) आईवडील आपल्याला घरखर्च देत नाहीत, घरात राहू देत नाहीत याच्या रागातून दोन्ही मुलांनी आपल्याच आईवडिलांचा काटा काढल्याचा प्रकार समोर आलाय.मृतांची नावे महादेव कांबळे (वय 70) आणि विठाबाई कांबळे (वय 65) अशी असून, दोघांचे मृतदेह दोन दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले होते
आणखी वाचा
Comments are closed.