शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, ‘जे कोणी अधि
मणक्राव कोकेटे: बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास अर्जुन नागरे (Kailas Nagare) यांनी विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घडली आहे. तीन पानांची सुसाईड नोट लिहून या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. कैलास अर्जुन नागरे शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. आता यावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी या शेतकऱ्याबाबत माहिती घेतली. तो एक आदर्श शेतकरी होता. त्याने दोन ते तीन वेळा आंदोलन देखील केले होते, त्याला आश्वासन देखील देण्यात आले होते. त्याचे प्रबोधन करण्यासाठी शासन, लोकप्रतिनिधी कमी पडला आहे का? हा एक इशू असू शकतो. त्यांना नियमाच्या बाहेर परवानगी हवी होती का? ते पण बघावं लागेल. मात्र जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे त्यांनी म्हटले होते.
जे कोणी अधिकारी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करणार
माणिकराव कोकाटे यांनी पुढे म्हटले आहे की, तो चांगला शेतकरी होता, प्रयोगशील शेतकरी होता. त्याला पुरस्कारही मिळाला होता. त्याने आत्महत्या करणे दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्राला ही घटना शोभणारी नाही. मला आणि शासनालाही याचे दुःख आहे. त्याला सरकारकडून मदत मिळेल. मात्र, कुटुंबाचा आधार गेला. मी आणि शासन कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. जे कोणी अधिकारी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विभागाला कळवले आहे. त्याची मागणी बेकायदेशीर होती का? हे त्याला समजून सांगायला हवं होतं, शासनाच्या नियमात सुधारणा करावी लागेल. पाणी हे आरक्षित असते, अतिरिक्त पाणी हवं असेल तेव्हा शासनाच्या नियमात बदल करावे लागतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्याच्या मृतदेहाजवळ आढळली तीन पानांची सुसाईड नोट
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील प्रगतशील व राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आपल्या शेतात विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली . आपलं जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी तीन पाणी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने अनेक दिवसापासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केला होता. गेला डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्नत्याग आंदोलनही केलं होतं. मात्र, परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
कृषीमंत्री कोकाटेंचे शेतकऱ्यांना आवाहन
बुलढाण्यासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी शासनाला वेळ द्यायला हवा. शासनाने देखील कुठल्या गोष्टी कराव्या याला मर्यादा असतात. मागण्यासाठी कालावधी लागतो, तो किती लागतो हे शासनाला ठरवावं लागेल. लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही जबाबदारी सरकारची आहे आणि यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=MMMSW_GM5G2M
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.