लालच बुरी बला.. सेवानिवृत्तीच्या 1 महिना आधीच तलाठ्याला लाच घेताना अटक; ACB कडून दोघांना बेड्या

बुलढाणा : सरकारी नोकरीत लागण्यापूर्वी आपण शेतकऱ्याची (Farmer) पोरं म्हणून भूषणावह सांगणारे, जेव्हा सरकारी अधिकारी बनतात तेव्हा शेतकऱ्यांनाच वेठीस धरतात असे अनेकदा पाहायला मिळालं आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करुन त्यांना विविध कामासाठी पैशांची मागणी होत असते. काही दिवसांपूर्वी ग्रामसेवक आणि महसूल कर्मचारी लाच (Bribe) घेताना अटक करण्यात आल्याचे पाहायला मिळालं. आता, बुलढाणा जिल्ह्यातही एका तलाठ्यासह महसूल कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. रावसाहेब काकडे असे तलाठी महाशयांचे नाव आहे, विशेष म्हणजे पुढच्याच महिन्यात त्यांची सेवानिवृत्ती होणार होती. मात्र, तत्पूर्वीच एसीबीएन (एसीबी) अटक केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तहसील कार्यालयात वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी व महसूल सहाय्यक असं दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तलाठी रावसाहेब काकडे व महसूल सहाय्यक मनोज झिने अशी लाचखोरांची नावे असून यातील तलाठी रावसाहेब काकडे याची सेवानिवृत्ती अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, पोलिसांनी रंगेहात धाड टाकत तलाठी महोदयांना अटक केली असून लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, शासकीय सेवेतील इतर भत्ते आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यापासून हे महाशय वंचित राहू शकतात.

पिक विम्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

परभणी जिल्ह्यात खरीप 2024 मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत पिक विमा अद्यापही असंख्य शेतकऱ्यांना मिळालेला नाही, या संदर्भात नेमण्यात आलेली आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. या संदर्भात कंपनीकडून ना खुलासा केला जात आहे, ना उर्वरित पिक विमा देत आहे. त्यामुळे तात्काळ या कंपनीला काळ्या यादीत टाकून शेतकऱ्यांना पिक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जोरदार ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाही देण्यात आल्या आहेत. जर लवकरात लवकर पिक विमा मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

हेही वाचा

माळेगाव कारखाना निवडणुकीत तावरेंना पहिलं यश; महिला गटातून अजित पवारांना ‘दे धक्का’

आणखी वाचा

Comments are closed.