लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, आदिती तटकरे तपशीलवार आकडेवारी सांगत म्हणाल्या…

लाडकी बहिन योजनेवर अदिती तटकरे : रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 66 लाख इतकी आहे.लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्यामुळं विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महायुती सरकारकडून 19 ते 20 महिने अपात्र महिलांना पैशांचं वाटप झालं आहे, या प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल विरोधी पक्षांकडून सरकारला विचारला जात आहे. या सर्व प्रकरणावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया मांडली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज बाद झालेले नाहीयेत. महायुतीची सर्वात महत्वकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे.  याची ई केवायसीची प्रक्रिया साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु झाली होती. पहिल्यांदा सुरुवातीला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर वाढवून आणखी दोन महिने वाढ झाली, पुन्हा दोन महिने वाढ झाली, असा 8 ते 10 महिन्यांचा कालावधी दिला आहे असं आदिती तटकरेंनी सांगितलं.

मंत्री आदिती तटकरे पुढं म्हणाल्या, ई केवायसी प्रक्रिया ही फक्त लाडकी बहीण योजनेत नाही. राज्याच्या ज्या ज्या डीबीटी योजना आहेत, या सगळ्यांमध्ये ई-केवायसी केली जाते. 80 लाखांचा आकडा आहे तो ई-केवायसीचा नाही. यात ई-केवायसी केलेली नसेल त्या महिला असतील. गेल्या दहा साडे दहा महिन्यापासून आम्ही आयटी विभागाकडून डेटा मागवला होता. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची माहिती मागवली होती.  त्याला साधारणपणे दहा ते अकरा महिन्याचा कालावधी गेला, त्या साडे अकरा ते बारा लाख महिलांचा 80 लाखांत समावेश आहे. साडे चार ते पाच लाख महिला आहेत ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा झालं अधिक आहेत, असंही आदिती तटकरेंनी म्हटलं.

ई-केवायसी करुनही काही महिलांचे लाभ बंद

सरकारी कर्मचारी महिला होत्या त्या काही हजारांमध्ये होत्या. त्यांची संख्या साडे चौदा हजार होती, त्यांच्याकडून वसुली सुरु आहे. काही नमो शेतकरीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या आहे. काही लाभार्थी महिलांनी आमच्याकडे विनंती केली आहे, ई केवायसी करुनही लाभ बंद झाला आहे. आम्ही त्याची फेरतपासणी करत आहोत. जेणेकरुन ज्या महिलेनं ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि  मंत्रीमंडळ असेल यांच्याशी चर्चा करुन ज्यांनी ई केवायसी केलेली आहे मात्र टेक्निकल अडचणीमुळं लाभ बंद झाला आहे ते पाहतोय, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.

संजय गांधी निराधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्हीतून अर्ज घेत होते ते छाननीतून कट झाले आहेत. मात्र, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ मिळणार आहे. 80 लाखांपैकी काही सव्वा तीन लाख महिला वाहनं नावावर असून त्या लाभ घेत होत्या. तो डेटा आरटीओकडून मिळालेला नाही. मात्र, आमच्या नावावरं वाहनं आली नाहीत अशी निवेदनं आली आहेत, त्याची फेरतपासणी केली जाईल.  साधारणपणे ज्यांनी ई केवायसी चुकवलेली होती, त्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ गेल्या आठवड्यापासून वितरित करतोय. त्यामुळं संंख्या किती असेल ते वितरित केल्यानंतर समोर येईल, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरेंनी दिली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.