तिसऱ्या मुंबईला बुस्ट मिळणार, रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
महाराष्ट्र गुंतवणूक नोकऱ्या: दावोस आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली गेलेल्या महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये रायगड आणि पेण परिसरात एक महत्त्वाचा प्रकल्प येणार आहे. राज्य सरकारने दावोस आर्थिक परिषदेत रायगड-पेण ग्रोथ सेंटर (Raigad Pen Growth Centre) उभारण्याच्यादृष्टीने प्रस्ताव मांडला होता. यासाठी दावोसमध्ये (Davos economic forum) एक महत्त्वाचा सामंजस्य करार झाला आहे. रायगड-पेण ग्रोथ सेंटरच्यानिमित्ताने महाराष्ट्रात फक्त गुंतवणूकच येणार नाही तर यानिमित्ताने आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञानही भारतात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. दावोसमध्ये होत असलेल्या सामंजस्य करारांमुळे आगामी काळात आपल्याला महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात उद्योग उभारता येतील. शहरी नियोजनासंदर्भात महाराष्ट्र सरकारने दावोसमध्ये केलेल्या करारांमुळे आपली शहर नियोजनाची क्षमता वाढणार आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्रात दळणवळणाच्यादृष्टीने चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास या गुंतवणुकीमुळे मदत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आगामी काळात राज्य सरकारकडून उभारणी केल्या जाणाऱ्या तिसरी मुंबईच्या परिसरात दावोसमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाल्याची माहिती आहे.
रायगड– पेण ग्रोथ सेंटरच्या प्रकल्पात जगातील अनेक कंपन्यांनी रस दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या कंपन्यांची यादी दावोसमधील पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. रिपब्लिक ऑफ कोरियाचा हनवा ग्रूप, स्वित्झर्लंडची एसएसबी कंपनी, अमेरिकेची फेडेक्स, फिनलँडची रिव्हर रिसायकल, दुबईची एमजीएसए, सिंगापूरची मेपल ट्री आणि ट्रिबेका डेव्हलपर्स या कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: 15 लाखांच्या नोटा?
भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये बोलताना नमदू केले होते. दावोस आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
हरित ऊर्जा, अन्न प्रक्रीया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डीजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरीपालघर, गडचिरोलीअहिल्यानगर या भागात पोहचणाऱ असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणा रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. याशिवाय, कार्लसबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूकीला पोषक वातावरणाचे कौतुक करताना राज्याच्या उद्योग धोरणाला दाद दिली. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्यासाठी प्रय़त्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोका-कोला कंपनीचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्यासमेवतदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांची गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली होती.
https://www.youtube.com/watch?v=UQq2QfwSFE4
आणखी वाचा
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
आणखी वाचा
Comments are closed.