आठ कोटीला गंडवल्याची सीएची तक्रार; खरातच्या व्यवहारांचा हिशेब होणार
आई-वडिलांच्या मृत्यूची भीती घालून भोंदू अशोक खरातने त्याचा सीए ललित पोफळे याला 8 कोटी 76 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
खरात अध्यक्ष असलेल्या सिन्नरच्या मिरगाव येथील शिवनिका ट्रस्टचा विश्वस्त व खरातचा सीए ललित पोफळे याच्या संपत्तीवरच त्याचा डोळा होता. आई-वडिलांचा मृत्युयोग आहे, तो टाळण्यासाठी अवतार पूजा करावी लागेल, असे सांगून त्याने पोफळेकडून तब्बल 8 कोटी 76 लाख रुपये उकळले. भोंदूगिरीचा भांडापह्ड झाल्यानंतर पोफळेने पोलिसांत धाव घेतली. सरकारवाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा याप्रकरणी खरातविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आतापर्यंत त्याच्याविरुद्ध एकोणीस गुन्हे दाखल असून, फसवणुकीचे दहा आणि लैंगिक अत्याचाराच्या नऊ तक्रारींचा यात समावेश आहे. पोफळे हा खरातचा अत्यंत विश्वासू सहकारी होता, त्याच्या ट्रस्टवरही विश्वस्त होता. त्याचे मालमत्तांचे व अन्य आर्थिक व्यवहार या सर्व बाबी पोफळेला माहीत आहेत. खरातच्या सर्वच व्यवहारांचा आता त्याच्या सीएकडूनच हिशेब मांडण्याच्या तयारीत पोलीस यंत्रणा आहे.
Comments are closed.