फरार निदा खानचे ‘कॉलिंग कनेक्शन’, नोकरी सोडली तरीही आरोपींच्या संपर्कातच, दानिशच्या मोबाईलमधील
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे आणि गंभीर होत चालले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि सध्या फरार असलेली निदा खान (Nida Khan) ही अटकेत असलेल्या आरोपींच्या सतत संपर्कात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nashik Crime News: नोकरी सोडली तरी संपर्क कायम
तपासात असे दिसून आले आहे की, निदा खान हिने कंपनीतील नोकरी सोडल्यानंतरही तिचे आणि या प्रकरणातील इतर आरोपींचे संबंध तुटले नव्हते. मोबाईल कॉलिंग डिटेल्स (CDR) नुसार, निदा खान आरोपींशी सातत्याने संवाद साधत होती. या संवादातून फसवणुकीचा मोठा कट रचला गेल्याचा संशय बळावला आहे.
Nashik Crime News: दानिश शेखच्या मोबाईलने उघड केले रहस्य
या प्रकरणातील दुसरा आरोपी दानिश शेख याच्या मोबाईलची तपासणी केली असता, SIT च्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. दानिशच्या मोबाईलमध्ये अनेक संशयास्पद फोटो आणि व्हिडिओ आढळून आले असून, या डिजिटल पुराव्यांचे आता सखोल विश्लेषण केले जात आहे. हे व्हिडिओ नेमके कशा संदर्भात आहेत आणि त्यातून कोणाचे चेहरे समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nashik Crime News: 27 एप्रिल रोजी होणार सुनावणी
SIT कडून सध्या सर्व तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी आणि फरार निदा खानच्या जामीन अर्जावर येत्या 27 एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. पोलीस या सुनावणीदरम्यान गोळा केलेले भक्कम पुरावे सादर करण्याची शक्यता असून, आरोपींना जामीन मिळणार की पोलीस कोठडीत वाढ होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nashik Crime News: दानिशची डिजिटल तटबंदी मोडीत
दरम्यान, टीसीएस कंपनीतील धार्मिक छळ आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणातील संशयित दानिश एजाज शेख (32) याने तपासात खोडा घालण्यासाठी निर्माण केलेली डिजिटल तटबंदी अखेर नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने मोडीत काढली. दानिशच्या मोबाईलचा फेस आयडी अनलॉक करण्यात एफएसएलला यश आले असून आता या कटामागील अदृश्य चेहरे आणि धागेदोरे उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
संशयित दानिश शेख हा टेक्नोसॅव्हीत चलाख असल्याचे समोर आले आहे. त्याने मोबाईलमधील प्रत्येक फाईल, चॅटस् आणि अॅप्लिकेशनसाठी स्वतंत्र पासवर्डस् तसेच प्रगत फेस आयडी सुरक्षा प्रणाली सक्रिय केली होती. यामुळे पंचवटीतील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (एफएसएल) तांत्रिक विश्लेषण करताना अडचणी येत होत्या. पासवर्ड क्रॅक करणे कठीण जात असल्याने तपासाची गती मंदावली होती.
तपासाच्या दृष्टीने मोबाईलमधील डेटा संकलित करण्यासाठी एसआयटीचे प्रमुख तथा सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी न्यायालयाकडे विशेष परवानगी मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार दानिशला शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी दिंडोरीरोडवरील फॉरेन्सिक लॅबमध्ये नेण्यात आले. तिथे कायदेशीर प्रक्रियेद्वारे संशयिताच्या प्रत्यक्ष फेस आयडीचा वापर करून मोबाईल यशस्वीरीत्या अनलॉक करण्यात आला. आता या मोबाईलमधील व्हॉटस्अॅप चॅटस्, ई-मेल्स, फोटो आणि व्हॉईस रेकॉर्डिंगचे सखोल विश्लेषण सुरू झाले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.