पहिले मिठी, मग प्रीती झिंटाने दिला पोटावर पंच…; प्रियांश आर्या म्हणाला, अरे मॅडम…, VIDEO

प्रीती झिंटा आणि प्रियांश आर्य व्हिडिओ: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल दोन सामने खेळवण्यात आले. यातील पहिला सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 264 धावांचा डोंगर उभारला, जो त्यांच्या आयपीएलमधील सर्वात मोठा स्कोअर ठरला. मात्र, पंजाबने अविश्वसनीय खेळी करत हा 265 धावांचा लक्ष्य 19व्या षटकातच गाठत विक्रम मोडला. पंजाबच्या विजयाची पायाभरणी प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्याने केली. दोघांनी पहिल्या 6 षटकांत 116 धावा ठोकत आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पॉवरप्ले स्कोअर नोंदवला. प्रभसिमरन सिंगने 26 चेंडूत 76 धावा केल्या आणि प्रियांश आर्याने 17 चेंडूत 43 धावा ठोकल्या.

प्रीती झिंटा आणि प्रियांश आर्य पंच, व्हिडिओ: (प्रीती झिंटा आणि प्रियांश आर्य)

दिल्ली कॅपिट्सविरुद्ध पंजाब किंग्सने सामना जिंकल्यानंतर संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा खूप आनंदी दिसली. सामना संपल्यानंतर प्रीती झिंटा मैदानात आली आणि पंजाबच्या खेळाडूंना भेटली. यादरम्यान, प्रीती झिंटाने प्रियांश आर्याला (Preity Zinta And Priyansh Arya) मिठी मारली. तसेच प्रेमाने पोटावर एक बुक्काही मारला. प्रीतीच्या या बुक्क्यानंतर प्रियांना आर्याने दिलेल्या रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रीती झिंटाने नकळत पोटावर बुक्का देताच मॅडम, जोर से लगा…असं प्रियांश आर्या म्हणाला.

ak

संबंधित बातमी:

DC vs PBKS IPL 2026 : पंजाब किंग्सने IPLचा इतिहास-भूगोल बदलला! मोडले सर्व रेकॉर्ड्स, 265 धावांचा यशस्वी पाठलाग करत दिल्लीला लोळवलं

आणखी वाचा

Comments are closed.