केएल राहुल, वैभव सूर्यवंशी की अभिषेक शर्मा? एका दिवसात 3 खेळाडूंचा ऑरेंज कॅपवर कब्जा; शेवटी बाजी कोणी मारली?

आयपीएल 2026 च्या ऑरेंज कॅप शर्यतीत शनिवारी (25 एप्रिल) मोठा नाट्यमय बदल पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याने तर या रेसला पूर्णपणे कलाटणी दिली. सामना सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली 328 धावांसह अव्वल स्थानावर होता. मात्र दिवस संपता-संपता ऑरेंज कॅपमध्ये मोठे बदल झाले.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुलने पंजाब किंग्सविरुद्ध नाबाद 152 धावांची वादळी खेळी केली. या खेळीमुळे त्याने थेट ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. केएल राहुलने विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.
त्याच्या नावावर आता 7 सामन्यांत 357 धावा असून, सरासरी 59.50 आणि स्ट्राईक रेट 187.89 इतका आहे.

दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 103 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि तब्बल 12 षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळे त्यानेही 357 धावांचा टप्पा गाठला आणि स्ट्राईक रेटच्या जोरावर तो थेट ऑरेंज कॅपवर पोहोचला.

संपूर्ण दिवसाच्या नाट्यानंतर अखेरीस सनरायझर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा याने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने 29 चेंडूत 57 धावांची आक्रमक खेळी केली. आता त्याच्या नावावर 8 सामन्यांत 380 धावा असून तो अव्वल स्थानी आहे. त्याचा सरासरी 54.29 तर स्ट्राईक रेट 212.29 इतका आहे. हेनरिक क्लासेनने देखील 349 धावांसह विराट कोहलीला मागे टाकले.

IPL 2026 ऑरेंज कॅप टॉप-5 फलंदाज

अभिषेक शर्मा – ३८० धावा
वैभव सूर्यवंशी – 357 धावा
केएल राहुल – ३५७ धावा
हेन्रिक क्लासेन – ३४९ धावा
विराट कोहली – ३२८ धावा

Comments are closed.