पालिका रुग्णालय खासगी कंपनीला देण्याचे टेंडर रद्द करा, समाजवादी पक्षाची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई महानगरपालिकेचे मानखुर्द येथील 410 खाटांचे लल्लूभाई कंपाऊंड रुग्णालय खासगी कंपनीला देण्याचे टेंडर रद्द करा, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. सपाचे आमदार रईस शेख यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिले आहे. या टेंडरसाठी बोली लावणाऱयांची आरोग्यसेवेतील पात्रता आणि अनुभव स्वतंत्रपणे पडताळेपर्यंत टेंडर प्रक्रिया स्थगित करावी असे त्यांनी नमूद केले आहे.

लल्लूभाई कंपाऊंड रुग्णालय सुरुवातीला 15 वर्षांसाठी आणि पुढे आणखी 15 वर्षांसाठी वाढवता येईल अशा कालावधीसाठी खासगी कंपनीला चालवण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाबाबत या पत्रात तीव्र शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. हे रुग्णालय चालवण्यासाठी जिया इंडस्ट्रियल ऑटोमेशन प्रा. लि. ही कंपनी बोली लावणारी ठरली आहे. मुंबईकरांच्या कराच्या पैशातून उभारलेले हे रुग्णालय 30 वर्षांसाठी खासगी व्यवस्थापनाखाली जाऊ शकते, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. बोली लावणाऱया कंपनीकडे आवश्यक अनुभव, पात्रता आणि क्षमता आहे का, हे पालिकेने स्पष्ट करावे, असे आमदार शेख यांनी पत्रात म्हटले आहे.

Comments are closed.