विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्…; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघ
पुणे : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपर (NEET) फुटीप्रकरणात सीबीआयच्या (CBI) कारवाईला वेग आला असून नाशिकपुणे या शहरांमधून अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणातील मनीषा वाघमारेला (Manisha Waghmare) रात्री उशिरा सीबीआय कडून अटक करण्यात आली आहे. मनीषा वाघमारेच्या मोबाईल फोन मधील माहिती, बँक व्यवहार आणि कॉल डिटेल्स याची तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर मनीषा वाघमारेला अटक केली आहे. पुण्यातील बिबेवाडीतील घरात कसून चौकशी करण्यात आली. 46 वर्षीय मनिषा ही पुण्यातील (Pune) बिबडेवाडी परिसरात राहत असून तिनेच विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचविण्याचं काम केल्याचा संशय आहे. (Neet Exam Paper leakage)
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम मनीषाच करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, मनीषा वाघमारे हिची कसून चौकशी करण्यात आली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळाली असून, बुधवारी पहाटे केलेल्या कारवाईत केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या मदतीने कात्रज परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव मनीषा संजय वाघमारे (४६) असून, ती सुखसागर नगर भागात ब्युटी पार्लर चालवते. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अहिल्यानगरमधून यापूर्वीच अटक करण्यात आलेला आरोपी धनंजय लोखंडे याला मनीषा वाघमारेने मदत केल्याचा संशय आहे. तथाकथित “गेस पेपर्स” (Guess Papers) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख्य आरोपींशी जोडून देण्यात तिची महत्त्वाची भूमिका असावी, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मनीषाच्या घराची झडती घेतली असून तपासासाठी तिचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. सध्या या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील चॅट्स, आर्थिक व्यवहार आणि संपर्क क्रमांकांची कसून तपासणी केली जात आहे. नीट पेपरफुटीच्या या मोठ्या रॅकेटचा सीबीआयकडून सध्या सखोल तपास सुरू आहे.
NEET Exam : नीट परिक्षा 21 जूनला घेण्यात येणार
पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली नीटच्या पुर्नरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. एनटीएकडून 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने पुढील प्रवेशांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. यामुळे युजीसी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया लांबणार आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. वर्षभर तयारी करुन परीक्षा दिल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप निर्माण झाला होता. मात्र, आता लगेचच 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो.
आणखी वाचा
Comments are closed.