चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षात फूट, प्रतिभा धनोरकरांनी 13 नगरसेवकांचा गट केला स्थापन
चंद्रपूर: चंद्रपूरमधील काँग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. चंद्रपूर काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धनोरकर यांनी आपल्या 13 नगरसेवकांना घेवून नागपूरच्या विभागीय कार्यालयात गट स्थापन केला आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडणून आले होते. त्यात प्रतिक्षा धनोरकर गटातचे 13 आणि विजय वडेट्टीवार गटाचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत.
काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीनंतर धनोरकर-वडेट्टीवार यांच्यातील वाद मिटला असे सांगितले जात होते. मात्र हा वाद पूर्णपणे मिटला असे अजुन तरी दिसत नाही. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस व मित्रपक्षाला 30 जागा मिळाल्यानंतर सत्तेची संधी निर्माण झाली. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रात इतरांनी लुडबुड करू नये, असे वक्तव्य माध्यमांसमोर केले होते. या वक्तव्याला काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आता या वादात एकमेकांचे समर्थकही उघडपणे उतरू लागले आहेत.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत केली नवीन गटाची नोंदणी
चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून सत्ता स्थापनेचा पेच अधिक रंजक झाला आहे. आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत आपल्या नवीन गटाची अधिकृत नोंदणी केली. या दोन्ही पक्षांच्या नव्या युतीमुळे आता चंद्रपूरच्या सत्तेच्या समीकरणाने मोठी कलाटणी घेतली असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांची धाकधूक वाढली आहे. जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ, अशी थेट भूमिका ठाकरे गटाने घेतल्याने आता चंद्रपुरात कोण कोणासोबत जाणार, याची चर्चा रंगली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेत किंगमेकर ठरण्यासाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ठाकरे गटाचे 6 आणि वंचितचे 2 असे एकूण 8 नगरसेवक आता एकाच गटात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.