संपत्तीचा वाद विकोपाला! सख्या भावानेच संपवलं बहिणीला, धक्कादायक घटनेनं चंद्रपूर हादरलं

चंद्रपूर क्राईम न्यूज : चंद्रपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सख्या भावानेच बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आई देखील गंभीर जखमी झाली आहे. भद्रवती शहरातील झाडे प्लॉट परिसरात ही घटना घडली आहे. सुरज शंकर भोंडे वय 28 वर्षे असं आरोपीचे नाव असून संजीवनी शंकर भोंडे वय 32 वर्षे असे मृतक बहिनीचे नाव आहे तर सौ पुष्पा शंकर भोंडे वय 58 वर्षे असे गंभीररित्या जखमी झालेल्या आईचे नाव आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर

संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून घरात वाद सुरु होता. यात आई व बहीण हे अलग राहत होते तर भाऊ आणि वडील अलग राहत असल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी झालेल्या जोरदार वादानंतर हा सर्व प्रकार घडला. भद्रावती पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भावाला अटक केली असून वडिलांना देखील ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

सोलापुरात जावयानेच संपवलं सासऱ्यावर

दक्षिण सोलापूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. इंगळगी गावातील जावयाने सासऱ्यावर धारदार चाकूने वार करत हत्या केली आहे. त्यानंतर आरोपी जावईने स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सिकंदर मुलका शेख असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सादिक सैफन दफेदार असे आरोपी जावयाचे नाव आहे.

आरोपीने स्वतःवरही वार करून घेतल्याची माहिती समोर

मयत सिकंदर शेख यांचा मुलगा आणि मुलगी पोलीस खात्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सादिक दफेदार याने शेतात सिकंदर शेख यांच्यावर धारदार चाकूने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या पंचनामा सुरू असून, नेमका खून कोणत्या कारणातून झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.