चंद्रपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, दुय्यम निबंधकासह कॉम्प्युटर ऑपरेटरला रंग
चंद्रपूर क्राईम न्यूज : चार हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूरमध्ये दुय्यम निबंधकासह कॉम्प्युटर ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज मोठी कारवाई केली आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधकाला कार्यालयातील कम्प्युटर ऑपरेटरच्या साह्याने 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. मोहन शेट्टीवार असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार दाखल केली होती
तक्रारदार यांना रजिस्ट्री च्या मोबदल्यात मोहन शेट्टीवार यांनी 4 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने आधी पडताळणी केली आणि लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर आज चंद्रपूर कार्यालयात अत्यंत गुप्तपणे सापळा रचण्यात आला. ऑपरेटरने लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.