Chandrapur लोको पायलटची संवेदनशीलता, रानगव्यांच्या कळपासाठी रेल्वेचा वेग मंदावला
धावत्या रेल्वेसमोर अचानक रानगव्यांचा कळप आल्याने लोको पायलटने रेल्वेचा वेग कमी केला. रानगव्यांना सुरक्षितपणे रेल्वे रुळ ओलांडता यावेत यासाठी त्यांनी रेल्वे थांबवून त्यांना मार्ग मोकळा करून दिला. बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावरील ही घटना लोको पायलट पप्पू शर्मा यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे.
धावत्या रेल्वेसमोर अचानक रानगव्यांचा कळप आल्याने लोको पायलटने रेल्वेचा वेग कमी केला. रानगव्यांना सुरक्षितपणे रेल्वे रुळ ओलांडता यावेत यासाठी त्यांनी रेल्वे थांबवून त्यांना मार्ग मोकळा करून दिला. बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावरील ही घटना घडली आहे. https://t.co/oCekKIIx0e
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 27 ऑक्टोबर 2026
रेल्वे रुळांवर रानगव्यांचा कळप दिसताच पप्पू शर्मा यांनी प्रसंगावधान राखत रेल्वेचा वेग कमी केला. त्यानंतर रानगव्यांचा कळप सुरक्षितपणे रुळ ओलांडून गेल्यावर रेल्वेने पुढील प्रवास सुरू केला. त्यांच्या या कृतीतून वन्यजीवांप्रती असलेली संवेदनशीलता आणि जबाबदारी दिसून आली. रेल्वे अपघातांमध्ये वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार समोर घडत आहे. यापूर्वी रेल्वे अपघातात २७ रानगव्यांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. अशा पार्श्वभूमीवर रानगव्यांचा जीव वाचवण्यासाठी घेतलेली ही खबरदारी महत्त्वाची ठरते. वन्यजीवांचे संरक्षण केवळ वनविभागाचीच नव्हे, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि दाखवलेली संवेदनशीलता वन्यप्राण्यांचे प्राण वाचवू शकते, असा सकारात्मक संदेश या घटनेतून मिळतो.
Comments are closed.