डहाणूत महामार्गावर भलेमोठे भगदाड, आंबोलीजवळ अपघाताचा धोका वाढला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेलगत आंबोलीजवळ नोठे भगदाड पडले आहे. सुमारे पाच ते नात फूट खोल असलेल्या या भगदाडामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. आंबोलीजवळील हे भगदाड भरण्याची नागणी होत असली तरी राष्ट्रीय महामार्ग नाधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

पावसाच्या पाण्यामुळे महामार्गालगतच हे भगदाड पडले आहे. त्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारामुळे भगदाडाचा अंदाज न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून सिमेंटचे बॅरिकेड्स ठेवण्यात आले आहेत. मात्र केवळ बॅरिकेड्स लावून प्रश्न सुटणार नसून भगदाडाची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या भगदाडाची माहिती महामार्ग प्राधिकरणाला कळविण्यात आली असून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले आहे, अशी प्रतिक्रिया चारोटी महामार्ग मदत केंद्राचे पोलीस अधिकारी अमोल जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.