मुनगंटीवार अन् जोरगेवार यांच्यातील वाद शमता शमेना; नागपुरातील बैठकीत पुन्हा शाब्दिक चकमक
चंद्रपूर वार्ता: चंद्रपूर महानगरपालिकेच्या (Chandrapur Municipal Election 2026) उमेदवार निश्चितीसाठी रविवारी नागपुरात (Nagpur) पुन्हा भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र कालावधीच्या या बैठकीत देखील सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या आधी गुरुवारी याच विषयावर नागपुरात झालेली बैठक वादळी ठरली होती. तर च्याएल झालेल्या बैठकीत जोरगेवार आणि मुनगंटीवार या दोन्ही गटांकडून भाजप उमेदवारांच्या स्वतंत्र्य याद्या पक्षाकडे सोपविण्यात आल्या आहेत. मात्र मुनगंटीवार आणि जोरगेवार (Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar) यांच्यातील वाद पाहता आता पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूरच्या (Chandrapur) भाजप उमेदवारांचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कोर्टात टाकल्याची माहिती सूत्रांनी देत आता आज देवेंद्र फडणवीस यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. फडणवीस यांच्या निर्णयानंतर उद्याच भाजपच्या उमेदवारांची (Chandrapur Municipal Election 2026) यादी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागपूर येथील विदर्भ कार्यालयात झालेल्या या बैठकीत माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती, निवडणूक प्रभारी माजी खासदार अशोक नेते, निवडणूक प्रमुख आणि आमदार किशोर जोरगेवार, भाजप शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार आणि माजी शहराध्यक्ष राहुल पावडे उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांकडून पक्षश्रेष्ठी पुढे चार निकष
दरम्यान, यापूर्वेकडील झालेल्या बैठकीत उमेदवार निश्चित करताना चार निकष वापरण्यात यावे, अशी अट सुधीर मुनगंटीवार यांनी घातल्याची माहिती आहे. त्यात एका कुटुंबात एकापेक्षा जास्त उमेदवारी दिली जाणार नाही. कुठल्याही नेत्याच्या निष्क्रिय मुलांना उमेदवारी दिली जाऊ नये. एक दोन महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाऊ नये. उमेदवारी फक्त सर्वेक्षणच्या रिपोर्टच्या आधारे त्यामधील इलॅक्टोरयल मेरिटच्या आधारे दिली जाईल. अशा सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षापुढे ठेवल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
Comments are closed.