Chandrapur News – लाच प्रकरणी भद्रावतीच्या वनपाल, वनरक्षक आणि एका व्यक्तीला घेतले ताब्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भद्रावतीच्या वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय कर्मचाऱ्यांवर धाड घातली आहे. तक्रारदार घराच्या कामासाठी अवैधरित्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक करत होता. या ट्रॅक्टरवर वनपथकाने कारवाई पूर्ण केली. या कारवाईतील प्रक्रिया पूर्ण करून ट्रॅक्टर लवकर सोडवण्यासाठी पथकातील सदस्यांनी 20 हजार रुपये लाच मागणी केली.

याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. वनपाल कोमल घुगलोत, वनरक्षक संदीप पारवे आणि रक्कम स्वीकारणारा व्यक्ती ललित नागपुरे अशा तिघांना एसीबीने या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास एसीबी चंद्रपूर करत आहे.

Comments are closed.