सावधान! गोरी क्रीममुळे किडनी निकामी होण्याचा धोका; अन्न व औषध प्रशासनाचा नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘गोरी’ (Gori) नावाच्या सौंदर्य प्रसाधनावर बंदी घालत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर परिसरातून या क्रीमचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, क्रीमच्या बॉक्सवर Made in Pakistan” असा उल्लेख आढळला आहे. तपासणीत या क्रीममध्ये पाऱ्याचे (Mercury) प्रमाण अत्याधिक असल्याचे समोर आले आहे.

त्वचेद्वारे पारा शरीरात गेल्यास किडनीवर गंभीर परिणाम होऊन मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा अन्न व औषधी प्रशासनाने दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना ही क्रीम तातडीने वापरणे थांबवण्याचे आवाहन केले असून, विक्रेत्यांनीही या उत्पादनाची विक्री करू नये, असे निर्देश दिले आहेत. कुठेही या क्रीमची विक्री सुरू असल्यास प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.