भाजपमधील अंतर्गत वादाचा नगरसेवकांना फटका; बहुमत असतानाही झोन सभापती पदावर सोडावं लागलं पाणी
चंद्रपूर भाजप बातम्या:
Chandrapur News चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 2 आणि झोन क्रमांक तीनच्या निवडणुकीत भाजपद्वारे आश्चर्यकारक माघार घेतल्याचे समोर आला आहे. झोन क्रमांक 2 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार ज्योती जीवने आणि झोन क्रमांक 3 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार जितेश कुळमेथे यांनी आपला उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतला आहे. या कृतीमुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि भाजप आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्यात असलेल्या वादाचा भाजप नगरसेवकांनाf जोरदार फटका बसल्याचे दिसून आलंय. (चंद्रपूर राजकारण बातम्या)
Kishor Jorgewar vs Sudhir Mungantiwar : बहुमत असताना देखील झोन सभापती पदावर सोडावं लागलं भाजपला पाणी
दरम्यानबहुमत असताना देखील भाजपला झोन सभापती पदावर पाणी सोडावं लागलंहे. भाजप प्रदेश कार्यालयाकडून झोन क्रमांक 1 साठी रवी लोणकर आणि महिला व बालकल्याण सभापती पदासाठी सुनिता जयस्वाल यांचं नाव पाठवण्यात आलं होतं. तर ही दोन्ही नावं मुनगंटीवार समर्थक नगरसेवकांची असल्याने आणि जोरगेवार गटाच्या एकाही नगरसेवकाचं नाव प्रदेश कार्यालयाकडून पाठवण्यात न आल्यामुळे किशोर जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. ज्योती जीवने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने झोन क्रमांक दोन मधून काँग्रेसच्या वैशाली चंदनखेडे यांचा बिनविरोध विजय झाला आहे. तर झोन क्रमांक 3 मधून जितेश कुलमेथे यांनी उमेदवारी अर्ज वापस घेतल्याने काँग्रेसचे रामनरेश यादव यांचा विजय झाला आहे.
विशेष म्हणजे झोन क्रमांक तीनमध्ये भाजपकडे 13 विरुद्ध 10 इतकं विजयी बहुमत असताना देखील भाजपने अचानक घेतलेल्या या माघारीमुळे भाजपमधील WHOरगेवार विरुद्ध मुनगंटीवार संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.