राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या जमिनींची पाहणी केली: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची (ख्रिश्चन मिशनरी लँड्स) तपासणी होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. येत्या तीन महिन्यात जमाबंदी आयुक्तांकडून ही तपासणी केली जाईल, अशी माहिती बावनकुळे यांनी विधानसभेत दिली आहे. तर धुळे जिल्ह्यात शेतकरी नसताना विकत घेतलेल्या जमिनीची आकडेवारी आम्ही घेत आहोत. कुणीही रजिस्ट्रेशन करायला आल्यावर त्याचा सातबारा राज्यात कुठे आहे? याचा संपूर्ण डेटा देण्याचा ऍक्सेस आपण मुद्रांक अधिकाऱ्यांना दिला आहे. धुळे जिल्ह्यात जर परप्रांतीय लोकांनी जमिनी घेतल्या असतील तर, तिथले विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांसोबत एक यंत्रणा तयार करून त्याची चौकशी केली जाईल. अशी माहितीहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी दिलीहे.

Chandrashekhar Bawankule: येत्या तीन महिन्यात जमाबंदी आयुक्तांकडून तपासणी

नाशिक मधील ख्रिश्चन मिशनरीच्या नावावर असलेल्या जमिनीचे अभिलेख तपासले जातील. येत्या तीन महिन्यात जमाबंदी आयुक्तांकडून ही तपासणी केली जाईल. या तपासणी दरम्यानविभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जमाबंदी आयुक्त कार्यालयातील एक अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी आणि आयजीआर मधील अधिकारी यांची समिती या प्रकरणाचा सखोल तपास करेल. यामधील खाजगी जमिनी शासनाच्या ताब्यात घेण्याचा विचार केला जाईल. ज्या ठिकाणी रहिवासी किंवा शासकीय बांधकाम आहे, त्याबाबत वेगळा विचार केला जाईल. तसेच पुढील तीन महिन्यात उच्चस्तरीय चौकशी करून याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आयहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीहे.

Dhule Lands Inspected : धुळे जिल्ह्यात परप्रांतीय लोकांनी जमिनी घेतल्या असतील तर….

तर पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तेधुळे जिल्ह्यातील कुळ कायदा यामध्ये अशी तरतूद आहे की राज्यातील एखादी जमीन घेण्यासाठी तो शेतकरी असावा. मात्र शेतकरी नसतानाही जमीन खरेदी सुरू आहे. जयंत पाटील यांनी देखील काल उल्लेख केला. मोपा एअरपोर्ट शेजारी देखील राज्याबाहेरील लोकांनी येऊन जमिनी विकत घेतल्या आहेत. राज्यातील हा आकडा शोधण्यासाठी जमाबंदी आयुक्त तपासणी करत आहेत. शेतकरी नसताना विकत घेतलेल्या जमिनीची आकडेवारी आम्ही घेत आहोत.

कुणीही रजिस्ट्रेशन करायला आल्यावर त्याचा सातबारा राज्यात कुठे आहे? याचा संपूर्ण डेटा देण्याचा ऍक्सेस आपण मुद्रांक अधिकाऱ्यांना दिला आहे. धुळे जिल्ह्यात जर परप्रांतीय लोकांनी जमिनी घेतल्या असतील तर, तिथले विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांसोबत एक यंत्रणा तयार करून त्याची चौकशी केली जाईल. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.