चलाख, मास्टरमाईंड सिया गोयल, देशाला हादरवणाऱ्या केसची स्टडी; नेमकं काय आहे रघुवंशी प्रकरण?

केतन अग्रवाल सिया गोयल पुणे लोहगड प्रकरण: लोहगडावरून ढकलून व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal) यांची हत्या केल्याच्या प्रकरणात धक्कादायक या माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्री हे महत्त्वाचे पुरावे ठरत आहेत. या सर्व डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास अधिक सखोल करण्यात येत असून, संबंधित पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत.

केतन अग्रवालला लोहगडावरुन ढकलण्याआधी पॉडकास्ट, व्हिडीओ आणि वेब सिरीज पाहून गुन्हा कसा करावा, याविषयी आरोपी सिया गोयलने (siya goyal) माहिती घेतल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये घडलेल्या खूनांच्या घटनांचा अभ्यास करून कोणत्या पद्धतीने गुन्हा केल्यास संशय कमी येईल, याबाबत आरोपींनी माहिती गोळा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच देशभरात गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याप्रकरणातील (raja raghuwanshi case) आरोपी सोनम रघुवंशी हिने जामीन कसा मिळवला होता, तसा जामीन आपल्यालाही मिळू शकतो का, याची तपशीलवर माहिती गोळा केल्याचे आता समोर आले आहे. सियाने केतनला ढकलण्याआधी माहिती घेतलेलं सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घ्या…

नेमकं काय आहे सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरण- (sonam raghuwanshi raja raghuwanshi case marathi)

राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी प्रकरण हे 2025 मधील देशभरात गाजलेल्या हत्याकांडांपैकी एक मानले जाते. मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह 11 मे 2025 रोजी झाला होता. लग्नानंतर दोघे मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेले. 23 मे रोजी सोहरा (चेरापुंजी) परिसरातून दोघे अचानक बेपत्ता झाले. सुरुवातीला अपहरण किंवा अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, 2 जून रोजी वेई सॉडॉन्ग धबधब्याजवळील खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळला आणि प्रकरणाने मोठे वळण घेतले. तपासादरम्यान मेघालय पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) अनेक सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड, स्थानिक मार्गदर्शकांची माहिती आणि इतर पुरावे गोळा केले. त्यानंतर सोनम रघुवंशीवरच पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांच्या आरोपानुसार, सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि इतर साथीदारांच्या मदतीने सुपारी देऊन राजाची हत्या घडवून आणली. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून तपासादरम्यान शस्त्र, मोबाईल डेटा आणि इतर महत्त्वाचे पुरावेही जप्त करण्यात आले.

सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरणाची देशभरात चर्चा-(sonam raghuwanshi raja raghuwanshi case)

या प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा झाली. राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली, तर सोनमच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला तिच्यावरचे आरोप फेटाळून स्वतंत्र तपासाची मागणी केली होती. पुढे न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान जामिनासंदर्भातही मोठी कायदेशीर घडामोड झाली. मेघालय उच्च न्यायालयाने सोनमला जामीन दिल्यानंतर तो रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ जामीन रद्द करण्यास नकार दिला आणि प्रकरणाचा खटला अद्याप न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अंतिम निकाल येणे बाकी आहे आणि आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे अद्याप शिल्लक आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Siya Goyal Pune Crime: 20 वर्षांच्या सिया गोयलचं प्लॅनिंग ऐकून चौकशी करणारे पोलीसही हादरले, कसलेल्या वकिलालाही लाजवेल असा अभ्यास, नेमकं काय घडलं?

Comments are closed.