वेळ पडल्यास ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू, पण खऱ्या कुणबींना…; मंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले
चंद्रशेखर बावनकुळे : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासह 40 ते 45 ओबीसी (OBC) नेत्यांची बैठक मुख्यमंत्री यांनी घेतली होती. यावेळी जीआरमधील मुद्द्यावर चर्चा झाली. हैद्राबाद गॅझेटमधील भागात खरा कुणबी असलेल्यांना जात प्रमाणपत्र जीआरमुळे मिळाले, वडेट्टीवार यांची मागणी तीच होती, आता वडेट्टीवार यांनी दखावावे की प्रशासनाने खोटे प्रमाणपत्र दिले, तसे असल्यास कारवाई करू. किंबहुना पुन्हा चर्चा करू. पण त्यांनी संभ्रम निर्माण करू नये. दोन समाजाला एकमेकांच्या पुढे आणू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी. वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू. त्या जीआरचा इतर भागाशी संबंध नाही, खऱ्या कुणबियाणे Treनाही सर्टिफिकेट द्यायचे नाही, हे योग्य नसल्याची अभिप्राय राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. वडेट्टीवार मराठवाड्यात जाऊन बोलले होते, मग आज विरोध का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी 1 नोव्हेंबरला ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकी संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथे बोलत होते.
नागपूर शेतकरी आंदोलन : स्वतः मुख्यमंत्री बैठक घेत आहे, आंदोलनाचा विचार पुढे ढकलावा
नागपूर शहरात पोलीस आयुक्त यांनी सुरक्षित शहर या अंतर्गत ऑपरेशन यु-टर्न सुरू केल आहे. आज नागपूरमध्ये पाच वाहतूक पोलीस चौकीचे उदघाटन झाले. हा चांगला उपक्रम आहे. दरम्यानबच्चू कडू, महादेव जाणून घेणे, अजित नवले आणि राजू शेट्टी यानी आंदोलनाचा इशारा दिला आहे. फक्त या चौघांना विनंती केली आहे की, 28 तारखेला मुख्यमंत्री बैठक घेत असल्यानं आंदोलनाचा विचार पुढे ढकलावा, शासनाची बैठक असल्यानं बैठकीनंतर पुढील दिशा ठरवावी. सोबतच चौघांशी फोनवर बोलणं झालं आहे, त्यांना विनंती केली ते28 तारखेला बैठकीत यावे, शासना सोबतच्या बैठकीतून जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळतो, स्वतः मुख्यमंत्री बैठक घेत आहे, या बैठकीत सर्वच विषयावर चर्चा होईल, त्यांनी शासनाला निवेदन दिले आहे, त्यावर बैठक होईल, तोडगा निघणार असा विश्वास आहे. असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
चंद्रशेखर गुलाम वर एकनाथ शिंदे : एकनाथ शिंदे एनडीएचे प्रगल्भ नेते
एकनाथ शिंदे हे NDA मध्ये आहे आणि दिल्लीत आमच्या नेत्यांशी भेटले, त्यात काही गैर नाही. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत का संभ्रम निर्माण केला जातो? संजय राऊत खोटे बोलतील आणि मी प्रतिक्रिया देऊ, हे योग्य नाही. खोट्याचा बाजार आहे, शिंदे NDA चे प्रगल्भ नेते आहे. मोदी यांना भेटल्यावर महायुती मजबूत होते, यात मधात मिठाचा खडा टाकण्याचे काम संजय राऊत करतातहे. असेही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.