मंडल यात्रा म्हणजे नौटंकी, बानकुळेंचा हल्लाबोल, म्हणाले, सत्ता गेल्यामुळं यांना काम नाही

चंद्रशेखर बारवान बुवाड पवार: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात मंडल यात्रा काढण्यात येत आहे. क्रांती दिनाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या या मंडल यात्रेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नागपूरमध्ये हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. दरम्यान, शरद पवार यांनी काढलेल्या मंडल यात्रेवर भाजपनं टीका केली आहे. आता सत्ता गेलेली आहे त्यामुळं यांना कुठलेही काम नाही, त्यामुळे हे मंडल यात्रा काढत असल्याची टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांनी केली. मंडल यात्रा म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याचे बावनकुळे म्हणाले.

ओबीसीबद्दल यांना कुठलाही कळवळा नाही

ओबीसीबद्दल यांना कुठलाही कळवळा नाही, याउलट आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या ओबीसी आरक्षणासहित घेत आहोत. त्यामुळं यांना ओबीसीचा कुठलाही कळवळा नसल्याची टीका बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर केली. काम नसल्यामुळे ही केवळ नौटंकी करत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

मंडल आयोगाला भाजपने केला होता विरोध

देशात सर्वात प्रथम महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज पक्षाच्या मंडल यात्रेची सुरुवात झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर डोळा ठेवून पवार पुन्हा एकदा ओबीसी समाजाला पक्षाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. मंडल आयोगाला भाजपने विरोध केला होता. अडवाणी यांच्या श्रीराम रथयात्रेला ‘कमंडल’ यात्रा म्हणून भाजप विरोधकाकडून संबोधले जात होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्या त्यावेळी पेटवला जात होता. त्याच संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमधून शरद पवार यांच्या हस्ते मंडल यात्रेला सुरुवात झाली आहे.

मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते

माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाची घोषणा केली होती. मंडल आयोगाला घटनात्मक दर्जा पण मिळाला. त्यावेळी राज्यात शरद पवार हे मुख्यमंत्री होते. त्यांनी या आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू केल्या होत्या. त्यातूनच मग ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मंडलच्या शिफारशी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते आणि त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते.

महत्वाच्या बातम्या:

Laxman Hake : अघटित घडली यात्रा, लांडगं निघालं तीर्था! शरद पवारांच्या मंडल यात्रेवर लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका

आणखी वाचा

Comments are closed.