बावनकुळे आधी म्हणाले मला माहिती नाही, मग बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला हजेरी, गिरीशभाऊंच्या कॉलनंत
मुंबईच्या सुधाकर बडगुझरवरील चंद्रशेखर बावंकुले: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले नाशकातील नेते सुधाकर बडगुजर (सुधीकर बॅडगुझर) यांनी आज (दि.17) भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. मात्र, त्यांच्या प्रवेशापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (चंद्रशेखर बराककुले) यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काहीही माहिती नसल्याचं नमूद केलं होतं. मात्र, दुपारी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावेळी खुद्द चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली आहे.
पक्ष प्रवेशावेळी सुधाकर बडगुजर काय म्हणाले?
भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना सुधाकर बडगुजर म्हणाले, आज माझा भाजपात प्रवेश झाला. आदराने प्रवेश झाला, त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. गिरीश भाऊ संकटमोचक आहेत. आपत्ती आली की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला. आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली हे माहिती नाही, मात्र मी निष्पाप आहे. कोव्हिडमध्ये मी चांगलं काम केलं, कोणी बाहेर येत नव्हतं. मात्र अचानक नीती ते घाला घातला आणि कारवाई केली. महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल… ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो. महाराष्ट्रात सांडपाण्यातून वीज निर्मिती प्रकल्प दिला. तो मुख्यमंत्र्यांनी दिला होता, ते दूरदृष्टीचे नेते आहेत. निष्ठेने काम करु आणि परिकाष्ठा करु, असंही बडगुजर यांनी सांगितलं.
सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित राज्याचा संकल्प झालाय. आम्ही सर्व कोअर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बडगुजर आणि घोलप यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष मजबूत होईल. अधिक ताकदीनं आम्हाला पुढे जाता येईल. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संकल्पाला पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. विकासासाठी भाजपात पक्षप्रवेश होत असतो. कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला. सकाळी निघालो तेव्हा वाटलं 2-3 दिवसांनी पक्षप्रवेश ठरेल. मात्र, आजच मंगळवार असल्याने त्यांनी आज ठरवलं.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, मनभेद नाहीत, मतभेद आहेत ते दूर होईल याचा विश्वास आहे. कोणी एखाद्या पक्षात असतो तेव्हा तो वाढवण्यासाठी पुढे जात असतो, कधी शिंतोडे उडवतो. मात्र, आता जबाबदारी आहे की जुन्या नव्यांना घेऊन पुढे जायचं आहे. ज्या पक्षाला आयुष्य देतो तिथे अपमान होत असेल आणि काळजी होत नसेल तर बरोबर नाही. नाशिकात येतील तेव्हा मेळावा घेऊयात, जे राहिले आहेत त्यांचा पक्षप्रवेश करूयात. भाजप तुमची प्रतिष्ठा कधीही कमी होऊ देणार नाही. पक्षात कधी वाटणार नाही कधी की नवीन घरात गेलोय. जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करत सर्वांनी राहावं इतकीच विनंती करतो.
बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत गिरीश महाजन काय म्हणाले?
गिरीश महाजन म्हणाले, प्रवेश कधी होणार? अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून चालल्या होत्या. आज तो दिवस आलेला आहे. मी सुधाकर बडगुजर यांचे अभिनंदन करतो. निवडणुका समोर आहेत, नाशिक बालेकिल्ला आहे. गेल्या वेळी 68 नगरसेवक होते, आणि आता किती करायचे 100 पार करायचे…आपण सर्व मिळून आता प्रयत्न करूयात. जास्तीत जास्ती पालिका, परिषदा हाती घ्यायच्या आहेत. आपण महायुतीत आहोत.
सुधाकर बडगुजर आणि बावनकुळे यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे वाद होता?
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Macao येथे कुटूंबासोबत गेले असताना त्यांचे कसिनो कसिनो खेळतानाचे फोटो खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती आणि आरोपांच्या फैरी देखील झाडल्या होत्या. मी कॅसिनो खळेत नव्हतो असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी त्यावेळीच दिले होते. कुटूंबासोबत आलेलो असताना अशा स्वरूपाचे फोटो व्हायरल करून संभ्रम निर्माण करणे योग्य नसल्याचा पलटवार बावनकुळे यांनी त्याचवेळी केला होता. बडगुजर यांच्या माध्यमातूनच संजय राऊत यांच्यापर्यंत फोटो पोहोचवले असे आरोप त्यावेळी करण्यात आले होते. बडगुजर यांचा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आमदार सीना हिरे यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता.
https://www.youtube.com/watch?v=kmzr7045zhe
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.