A‎I मुळे अमेरिकेतली कोट्यवधी रुपयांची कंपनी धोक्यात, Chat GPTच्या मोफत आणि जलद सेवेमुळे Chegg कंपनी दिवाळखोरीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एकेकाळी ऑनलाइन शिक्षण क्षेत्रातील मोठे नाव असलेली अमेरिकन कंपनी Chegg आता आर्थिक अडचणीत सापडली असून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि विशेषतः ChatGPT मुळे कंपनीच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत हवी असल्यास Chegg हा पहिला पर्याय मानला जात होता. गृहपाठ करण्यासाठी, प्रश्नांची उत्तरे मिळवणे किंवा परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी या प्लॅटफॉर्मचा वापर करत होते. मात्र या सर्व सेवा पेड होत्या आणि त्यामुळे कंपनीला चांगला नफाही मिळत होता.

2021 च्या सुमारास Chegg आपल्या सर्वोच्च शिखरावर होती. कंपनीची किंमत तब्बल 15 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती. मात्र त्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. 2022 मध्ये ChatGPTसारखी AI साधने बाजारात आल्यानंतर विद्यार्थ्यांना तेच उत्तर काही सेकंदांत आणि तेही मोफत मिळू लागलं. Chegg जी सेवा पैस घेऊन देत होती तीच सेवा Chat GPT मोफत आणि जास्त फास्ट देत होते. यामुळे Cheggच्या पेड मॉडेलची गरज कमी होऊ लागली. हळूहळू कंपनीचे युजर्स घटू लागले, वेबसाइटवरील ट्रॅफिक कमी झाले आणि सर्वात मोठा फटका सबस्क्राइबर बेसला बसला. कंपनीच्या उत्पन्नातही मोठी घट झाली.

Cheggने स्वतः मान्य केले आहे की ChatGPT आणि इतर AI टूल्समुळे त्यांच्या व्यवसायाला थेट नुकसान झाले आहे. AIच्या वाढत्या वापरामुळे कंपनीचे शेअर्सही एका टप्प्यावर 40 ते 50 टक्क्यांनी घसरले. याशिवाय Googleच्या AI फीचर्समुळेही Cheggला आणखी मोठा धक्का बसला. आता Google सर्चमध्येच थेट उत्तरे मिळत असल्याने वापरकर्त्यांना Cheggच्या वेबसाइटवर जाण्याची गरज कमी झाली. परिणामी, कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरील ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात घसरला.

व्यवसायाच्या दृष्टीने पाहता, Cheggची सर्वात मोठी अडचण म्हणजे तिचा संपूर्ण व्यवसाय ‘होमवर्क हेल्प’ या एकाच सेवावर अवलंबून होता. AIने हेच काम अधिक जलद आणि मोफत करून दाखवले, त्यामुळे कंपनीकडे पर्याय उरले नाहीत. त्यातच Cheggला AIशी स्पर्धा करताना स्वतःमध्ये बदल करण्यास उशीर झाला.

परिस्थिती इतकी गंभीर झाली की कंपनीला मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करावी लागली. हजारो लोकांना नोकरी गमवावी लागली. 2025 मध्ये कंपनीच्या महसुलात सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी घट झाली असून तोटा वाढला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, Chegg ही माहिती विकणारी कंपनी होती. मात्र AIमुळे हीच माहिती मोफत आणि त्वरित उपलब्ध झाली. त्यामुळे तिचा मुख्य व्यवसायच कोलमडला.तज्ज्ञांच्या मते, ChatGPTने Cheggला थेट संपवले नाही, पण तिचा व्यवसाय इतका कमकुवत केला की कंपनी टिकू शकली नाही.

Comments are closed.