चेहऱ्यावर भाजल्याच्या खुणा, प्रोस्थेटीक पाय… अशा अवस्थेत आहेत मोजतबा खामेनी
इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी हे अमेरिकेसोबत युद्ध सुरू झाल्यापासून एकदाही समोर आलेले नाही. त्यांच्याबाबत दररोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. नुकत्याच समोर आलेल्या एका वृत्तानुसार मोज्तबा खामेनी हे इराणवर झालेल्या एअरस्ट्राईकमध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भाजल्याच्या खुणा असून त्यांच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्या पायावर तीन वेळा शस्त्रक्रीया झाली असून त्यामुळे त्यांना प्रोस्थेटिक पाय वापरावा लागणार आहे.
28 फेब्रुवारी रोजी तेहरानमधील खामेनी यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अय़ातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला होता. तर मोज्तबा हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.
मोज्तबा यांच्या एका पायावर तीन वेळा शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यांच्या एका हातावर देखील शस्त्रक्रीया झाली असून आता हळू हळू तो हात बरा होऊ लागला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर व ओठावर भाजल्याच्या गंभीर जखमा आहेत. त्यामुळे त्यांना व्यवस्थित बोलताही येत नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरीही केली जाऊ शकते. तसेच त्यांच्या शस्त्रक्रीया झालेल्या पायाच्या जागी प्रोस्थेटीकचा पाय लावला जाऊ शकतो असे समजते. NDTV ने याबाबत वृत्त दिले आहे.
Comments are closed.