चेंबूरमध्येही तरुणांचा उद्रेक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱया सीजेपीच्या समर्थनार्थ आज चेंबूरच्या सिद्धार्थ नगरात लोक रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱया दिल्ली पोलिसांचा निषेध करत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी पूर्व द्रुतगती मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी आंदोलकांना रोखले.

दिल्लीतील आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच पाण्याचा मारा करून आंदोलन चिरडण्यात आले. तरुण-तरुणींना बेदम मारहाण करण्यात आली. याच्या निषेधार्थ सिद्धार्थनगरातील जनता आज रस्त्यावर उतरली. तरुण तसेच ज्येष्ठांनी रस्त्यावर उतरून दिल्ली पोलीस, भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा धिक्कार केला. पोलीस व आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे काही वेळ तेथे तणावाचे वातावरण झाले होते.

आठ गुन्हे, शेकडो विद्यार्थी ताब्यात

सोमवारी चैत्यभूमी येथे आंदोलन करण्यासाठी आलेल्या 400 हून अधिक विद्यार्थ्यांना पोलिसांनी उचलून अक्षरशः फरफटत नेले. गाडीत कोंबून त्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी भोईवाडा, काळाचौकी, शीव, दादर, वडाळा टीटी, वरळी, माहीम आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल करण्यात आले.

Comments are closed.