अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान दिसलं असतं; एएआयबीच्या अहवालावर छगन भुजबळा
छगन भुजबळ: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. ते मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला, जो बारामती विमानतळाजवळ घडला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करत हा अपघात आहे की संभाव्य घात, असा प्रश्न उपस्थित केला.
या प्रकरणी 28 फेब्रुवारीला एएआयबीचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर झाला. अहवालानुसार, लँडिंगच्या वेळी विमान प्रथम एका झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले. एएआयबीच्या अहवालावर अनेक नेत्यांनी शंका व्यक्त केली होती. यामध्येच आता अजित पवारांच्या अपघाताविषयी एएआयबीच्या रिपोर्टवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही शंका व्यक्त केली आहे. अजित पवार यांचे विमान आधी झाडावर आदळलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान झालेलं दिसलं असतं. विमान झाडावर पडल्याचं कोणी पाहिलेले नाही. विमान हवेत कलले होते आणि कोसळले, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील दिसून येत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
Chhagan Bhujbal: मला देखील आश्चर्य वाटले की…
नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी एएआयबीच्या रिपोर्टबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही तिथे गेलो, तेव्हा तिथे आम्हाला कोणीही झाड विमानावर आदळल्याचे सांगितले नाही. विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते. कोणीही असे म्हणत नाही की, विमान झाडावर आदळले. मला देखील आश्चर्य वाटले की, कुठल्या झाडावर विमान आदळले. तिथे एकही मनुष्य असा भेटला नाही की, तो विमान झाडाला आदळल्याचे सांगत होता. विमान झाडाला आढळले असेल तर झाडाचे नुकसान झाले असते, असे म्हणत त्यांनी एएआयबीच्या अहवालावर शंका उपस्थित केली.
Chhagan Bhujbal: ‘तो’ व्हिडीओ अजितदादांच्या विमानातील नाही
अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, तो व्हिडीओ अजितदादांच्या विमानातील नाही. मालक त्यात असता तर ठार झाला असता. पण ते चुकीचे आहे. फक्त पायलटच त्या सीटवर बसू शकतो. मालक झोपला असेल तर निष्काळजीपणा आणि मुजोरपणा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.