आंदोलन जालन्यात कर, मुंबईत कर किंवा दिल्लीत कर, त्याला कोण आडवतंय, जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ
मानोज जरेंग पाटीलवरील छगन भुजबाल: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी येत्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 29 ऑगस्टला मुंबईत दाखल होणारच, कोणीही आडवं आलं तरी थांबणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. आता यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की, त्याला कोण आडवं येत आहे. आंदोलन जालन्यात कर किंवा अंतरवाली सराटीत कर. आंदोलन मुंबईत कर नाहीतर दिल्लीत कर. पण आंदोलन नियमात करा. संविधानाचे दिलेले अधिकार आहे. उपोषण कर, भाषण कर पण नियमात कर. मात्र कोणती कुरघोडी करू नये. मराठा समाजाला आरक्षण देता आले ते दिले, आणखी काय पाहिजे? इतर कोणत्या समाजात गेलं तर कोणी सहन करणार नाही. ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सुरज चव्हाणांच्या नियुक्तीबाबत भुजबळांचे वक्तव्य
सुरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, माझ्यासमोर सुरत चव्हाण यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. त्याने अनेक वर्ष पक्षात काम केले आहे, त्यांची चूक झाली त्याची माफी मागितली आहे. काही कारणामुळे त्यांना महत्त्वाच्या पदावरून दूर करणे किंवा त्यांना शिक्षा देणे, कायमस्वरूपी लांब ठेवणे हे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
ध्वजारोहण कुठेही करा, आपला झेंडा एकच
15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार गिरीश महाजनांना नाशिकमधल्या ध्वजारोहणाची तर भुजबळांना गोंदियातल्या ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र भुजबळांना नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्याची इच्छा होती. त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण केले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, ठीक आहे, मी अनेक वर्ष नाशिकमध्ये ध्वजारोहण केले आहे. मला स्वतः ला इतर ठिकाणी जाणे शक्य होत नाही. ध्वजारोहण कुठेही करा, आपला झेंडा एकच आहे, आपण फक्त वंदन करा. वंदन कुठे करायचे त्यामुळे महत्व कमी होत नाही. झोपडपट्टीला जरी झेंडा लावला तरी तो आनंद आहे. आता तुम्ही हे विषय बंद करा, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
Manoj Jarange : कुणीही आडवं येवो, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीमधूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे
आणखी वाचा
Comments are closed.