नाशिकमधील 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, पाणी उपसा के
छगन भुजबाल: नाशिक जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील 776 गावांमध्ये विहीर खोदण्यास बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले असून नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक जास्त प्रमाणात शेती केल्या जाणाऱ्या येवला, निफाड, सिन्नर तालुक्यात भूजल पातळी (Groundwater Level) गंभीररित्या खालवली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भीषण पाणी टंचाई (Nashik Water Crisis) निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भूजल पातळीबाबत ते म्हणाले की, भूजल पातळी कमी व्हायला आपणच जबाबदार आहेत. सर्वात जास्त प्रमाणात पाणी उपसा केल्याने ही परिस्थिती उभी राहिली आहे. सर्वांना आपली शेती बागायती करायची आहे. एक शर्यत लागली आहे. हा मानवी धर्म आहे हा सर्व ठिकाणी आहे. जगामध्ये देखील ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. प्रमाणाच्या बाहेर आपण त्याचा वापर करत आहोत, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावर भुजबळांची प्रतिक्रिया
छगन भुजबळ म्हणाले की, एकंदरीत सर्वांचं मत आहे की बजेट हे कौतुकास्पद आहे. सामनाच्या फ्रंट पेजवर देखील बजेटवर भाष्य केले आहे. रोजगाराला चालना देणारे बजेट आहे. नाशिकसाठी जर काही सिंहस्थासाठी कमी असेल ते मिळाले नाही तर त्यासाठी आपल्याला पुढे मागणी करावे लागेल. मध्यमवर्गीयांना खुश केले आहे, बारा लाखापर्यंत असलेल्या उत्पन्नावर कर फ्री केला आहे. आमच्यासारख्या ज्येष्ठांसाठी देखील फायदा होणार आहे. किसान क्रेडिट कार्ड तीन लाखावरून पाच लाखापर्यंत केल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळी, युरिया यासाठी चांगल्या योजना केल्या आहेत. धनधान्य योजना सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यासाठी त्यांनी उपाययोजना केल्या आहेत. शिक्षणामध्ये देखील मोठी गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. आरोग्य क्षेत्रातही अशीच परिस्थिती आहे.
टीका केलीच पाहिजे, पण…
स्टार्टअप योजनेसाठी दहा हजार कोटींची तरतूद केली आहे. बिहारला विशेष मदत केली आहे तर महाराष्ट्राला देखील कमी केले नाही. पण काही विकास कामांचे प्रोजेक्ट घेऊन मुख्यमंत्र्यांचा माध्यमातून आपण आपले प्रश्न मार्गी लावू शकतो. विरोधी पक्षाचे देखील मोठ्या संख्येने खासदार आहे. त्यात त्याच्यात काय कमी आहे हे त्यांनी ते सांगून त्यात सुधारणा केली पाहिजे आणि चांगले झाले त्याचा अभिनंदन केले पाहिजे. टीका केलीच पाहिजे पण ती टीका कशासाठी केली ते पण सांगितले पाहिजे. कोणत्या क्षेत्रात कमी केले आहे, महाराष्ट्रात काय कमी आहे त्यावर विरोधकांनी बोलले पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
आणखी वाचा
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांकडून पोलिसांची कानउघडणी, म्हणाले; बीडचं नाव घेता इतर ठिकाणी काय सुरुय?
अधिक पाहा..
Comments are closed.