शरद पवार यांचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपसोबतच्या चर्चा, छगन भुजबळ म्हणाले…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग देण्यात आला आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एबीपी माझासोबत एक्स्लुझिव्ह संवाद साधला. या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या सोबत येण्यासंदर्भात काय चर्चा झाल्या होत्या, याबद्दल माहिती दिली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यावेळी काय घडलं होतं हे देखील सांगितलं.
छगन भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ यांना शरद पवारांसोबत बसून संविधान लिहिलं, तुम्ही सोडून आलात, पक्ष कुणाचा अजित पवारांचा की शरद पवारांचा असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले की, असं काम तर सगळ्यांनीच केलेलं आहे, हे मान्य करावं लागेल की पवारसाहेब या वयात शारीरिक व्याधी असताना सुद्धा माझ्यापेक्षा ते जास्त काम करतात, अजितदादा 6 वाजता जातात, एवढं मला शक्य नाही. पवार साहेब जातात ना. हा जो पक्ष आहे, त्यावेळी पवारसाहेब, छगन भुजबळ यांची दोन हेलिकॉप्टर फिरत होती आणि पक्ष बांधणी केली, असं छगन भुजबळ म्हणाले. 2014 आठवा बघू मला ते सांगायला पाहिजे, तिथून सांगावा आला दिल्लीतून तुम्ही काँग्रेस सोडा, आम्ही शिवसेना सोडतो, वेगवेगळं लढूया, नंतर तुम्ही मंत्री व्हा. 2014 ला त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं, आम्ही काँग्रेस ताबडतोब सोडली, वेगवेगळं लढलो. दोन महिन्यात आम्ही जाणार होतो, शरद पवार साहेब अलिबागला म्हणाले मी कायमचा सपोर्ट भाजपला करणार नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
मला त्या चर्चांबद्दल माहिती नाही
छगन भुजबळ पुढं म्हणाले की, देवेंद्र फडणवीस पॅनिक झाले, त्यांनी विरोधी पक्षनेते असलेल्या एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं. तुम्ही चर्चा केलीत, तुम्ही ते म्हणतात तसं ऐकलं ठीक आहे.मला जेल झाली, 2017 साली कुण्या उद्योगपतीच्या घरी झाली त्यावेळी शिवसेना भाजपचं सरकार होतं, एवढी खाती, हे अमकं तमकं सगळं झालं. परत लास्टला साहेब म्हणतात ते बरोबर आहे पण तुम्ही शिवसेना सोडा आणि आमच्यासोबत या, त्यांनी सांगितलं शिवसेना जुना पार्टनर आहे, आम्ही त्यांना सोडणार नाही. म्हणजे तुम्ही चर्चा करत होता, मला माहिती नाही, मी त्या चर्चेत नव्हतो, असं छगन भुजबळ म्हणाले.
अजित पवारांच्या 8 वाजताच्या शपथविधीवर भुजबळ काय म्हणाले?
2019 ला निवडणूक झाल्यानंतर पुन्हा चर्चा झाली, मी त्या चर्चेत नव्हतो. तुम्ही शिवसेना सोडा, तुम्ही आम्ही सरकार बनवू, पवारसाहेब तिकडे गेले, अजित पवार तिकडे गेले, मला माहिती नाही, माझ्या अपरोक्ष घडलं, असं छगन भुजबळ म्हणाले. मी अजित पवार यांना बाजूला नेऊन विचारलं, ते म्हणाले मै अजित पवार हूं, आपको जबान देता हूं, हम पुरा करेंगे, झालं ना ते 8 वाजता गेले आणि शपथ घेतली तो त्याच पोटी झालेला प्रकार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. आम्हाला माहिती नाही काय झालं ते. भाजपनं शिवसेनेला सरकारमध्ये घ्यायचं नाही यासाठी सोडली, आम्हाला घ्यायचं होतं. ऐनवेळी सगळं झाल्यानंतर पवारसाहेब पुन्हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंकडे वळले. माझं म्हणनं असं होतं की तुम्ही चर्चा का करता? असंही ते म्हणाले.
शरद पवारांनी राजीनामा का दिलेला?
उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आल्यानंतर मी मोदींच्या विरुद्ध भाषणं करत होतो. सर्वात जास्त कडक भाषण करत होतो. परत यांच्या आतमध्ये चर्चा सुरु होत्या. शिंदे तिकडे जायच्या अगोदर यांची चर्चा होती जायची. मला माहिती नाही, यांनी उशीर केला. पवार साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला, त्यावेळी असं ठरलं की मी काही येणार नाही, मी राजीनामा देईन, सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करु, तुम्ही सरकारमध्ये जा, मात्र तीन दिवसांनी पवार साहेबांनी माघार घेतली. अजित पवारांच्या घरात सगळं ठरलं होतं, असं छगन भुजबळ म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=noqxca3ayxy
अधिक पाहा..
Comments are closed.