छगन भुजबळांकडून पोलिसांची कानउघडणी, म्हणाले; बीडचं नाव घेता इतर ठिकाणी काय सुरुय?

छगन भुजबळ, नाशिक : येवला शहर परिसरातील अवैध धंद्याबाबत माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ आक्रमक झालेत. बीडचं नाव न घेता राज्यात इतर ठिकाणी काय चाललंय? ते या ठिकाणी घडवायचं नाही. येवला तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे.  येवल्यात उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले..यावेळी त्यांनी पोलिसांच्या कामकाजाबाबत एका प्रकारे नाराजी व्यक्त केली.

येवला शहर परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत आमदार छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत मी अनेक वेळा या धंद्या बाबत तक्रार केली मात्र धंदे सुरूच आहे..बीडचं नाव न घेता भुजबळ यांनी राज्यात इतर ठिकाणी काय चाललं ते या ठिकाणी घडवायचं नाही. या तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, असं सांगत भुजबळ यांनी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली..

छगन भुजबळ म्हणाले, कोणाचा कार्यकर्ता आहे हे पाहायचं नाही, जे चुकीचं काम करत असतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. या मंत्र्याचा फोन आला, त्या मंत्र्याचा फोन आला म्हणून असला धंदा करायचा नाही. इथे काही अवैध धंदे सुरु आहेत. आम्ही पत्त्यासह माहिती दिली आहे. एकदा बंद झाला परत चालू झाला. आपले पोलीस काय करतात. परत परत तुमच्याकडे यावे लागू नये. इतर ठिकाणी काय चालूये ते माझ्या तालुक्यात चालणार नाही.

– येवला शहर परिसरातील अवैध धंद्या बाबत छगन भुजबळ आक्रमक…
– बीडचं नाव न घेता राज्यात इतर ठिकाणी काय चाललं ते या ठिकाणी घडवायचं नाही…
– तालुक्यात शांतता राहिली पाहिजे ; पोलीस अधिकाऱ्यांची केली कान उघडणी…

येवला शहर परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत आमदार छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत मी अनेक वेळा या धंद्या बाबत तक्रार केली मात्र धंदे सुरूच आहे..बीडचं नाव न घेता भुजबळ यांनी राज्यात इतर ठिकाणी काय चाललं ते या ठिकाणी घडवायचं नाही. या तालुक्यात शांतता राहिली पाहिजे असे सांगत त्यांनी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली..येवल्यात उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले..यावेळी त्यांनी पोलिसांच्या कामकाजाबाबत एका प्रकारे नाराजी व्यक्त केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Budget 2025 Income Tax Slab : पगारदारांना 12 लाख उत्पन्न करमुक्तीचा आनंद गगनात मावेना, पण ‘या’ दोन अटी अडचणी वाढवणार की नव्या कायद्यात सुटका होणार?

अधिक पाहा..

Comments are closed.