जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
पुणे: राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) विमानाला 28 जानेवारीला झालेल्या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं देशरात शोककळा पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अपघाताची गंभीर दखल घेत तपासाची मागणी हवाई मंत्रालयाकडे केली आहे. मात्र, अपघाताच्या 1 महिन्यानंतरही संशयाचे धुके कायम आहेत. त्यातच, विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. तर, दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्याकडून व्हीएसआर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. आता, अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत कंपनी मालकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जय पवार यांच्या या व्हिडिओची दखल हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांनी घेतली आहे.
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनासंदर्भात आलेल्या अहवालात सुरुवातीला हे विमान झाडावर आदळलं, त्यानंतर जमिनीवर कोसळलं. ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावर 3 हजार मीटर दृश्यमानता होती, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तर, उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं, असंही अहवालात म्हटलंय. दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे. आता, या व्हिडिओवर नागरी उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जय पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला आहे. मी तो व्हिडिओ पाहिला आहे, योग्य ती दखल घेतली जाणार, असे मंत्री मोहोळ यांनी म्हटले. दरम्यान, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीत बोलताना, देश पातळीवर अनेक पर्यटक अडकलेले आहेत, हवाई उड्डाण मंत्रालयाकडून त्याची योग्य ती दखल घेतली जाणार आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर सर्व पर्यटकांना आणले जाईल, आमच्या खात्याची ती जबाबदारी आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले.
एअरपोर्ट कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न करणार
केंद्रीय प्रकल्पामध्ये केंद्रीय पातळीवरील प्रकल्पांचा आजच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये जायका, मेट्रो, नदी सुधार प्रकल्पाचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. नवीन मार्गाची कनेक्टिव्हिटी, नवीन मेट्रो मार्गाची विमानतळाशी कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.