धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP आता राजकारणात प्रवेश करणार का? त्या चर्चांवर आशुतोष
CJP in Politics: केंद्र सरकारने आंदोलकांच्या मुख्य मागण्या मान्य केल्यानंतर लगेचच दिलेल्या मुलाखतीत CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी आपल्या मोहिमेच्या भविष्यावर आणि हा गट पुढे जाऊन राजकीय पक्ष बनू शकतो का, यावर चर्चा केली. जेव्हा ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) एका नेत्याला विचारण्यात आले की, ते पूर्णवेळ राजकारणात सहभागी होणार का, तेव्हा ते म्हणाले, “भारतात कोणत्याही गोष्टीसाठी कधीही ‘नाही’ म्हणू नये.” CJP नेत्यांनी सध्या तरी पूर्णवेळ राजकारणात येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तरुणांच्या नेतृत्वाखालील तळागाळातील आंदोलनाला बळकट करणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
रांका यांनी NDTV शी बोलताना सांगितले, “माझ्या मनात सध्या एकच गोष्ट आहे, घरी जाऊन झोपणे, थोडा आराम करणे आणि माझ्या कुटुंबाला भेटणे. मी गेल्या काही महिन्यांपासून घरापासून दूर राहिलो आहे आणि खरोखरच मला आता फक्त आराम करायचा आहे आणि गेल्या दोन महिन्यांत जे काही घडले आहे त्यावर विचार करायचा आहे. मला वाटते की ही आपल्या सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे, हा अभिमानाचा क्षण आहे. हा खरोखरच आनंदाचा आणि सुटकेचा निश्वास सोडण्याचा क्षण आहे आणि यानंतर पुढे काय होते ते आपण पाहू.”
CJP in Politics: ‘नाही’ म्हणू नये – रांका
जेव्हा त्यांना थेट विचारण्यात आले की, ते राजकीय करिअरची शक्यता पूर्णपणे नाकारत आहेत का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “मला वाटते की भारतात कोणत्याही गोष्टीला ‘नाही’ म्हणू नये.” तर, सौरव दास यांनी ठामपणे सांगितले की, राजकारण हा या गटाचा तत्काळ उद्देश नाही. दास यांनी स्पष्ट केले, “सध्या आमचे लक्ष पूर्णपणे स्पष्ट आहे की, हे आंदोलन तळागाळापर्यंत घेऊन जायचे आहे, कारण देशात आधीच ७५०-८०० राजकीय पक्ष अस्तित्त्वात आहेत. त्यांपैकी कोणताही पक्ष तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये. आम्हाला हे आंदोलन तळागाळापर्यंत नेायचे आहे जेणेकरून सत्तेत कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता असो, त्यांनी तरुणांसाठी काम केले पाहिजे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. सध्या आमचा हाच अजेंडा आहे.”
धर्मेंद्र प्रधान : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला काल (शनिवारी, ता 25) अखेर यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशारा देत आंदोलन आणखी तीव्र करण्याची इशारा दिला होता. दिल्लीतील या आंदोलनाचे लोण मुंबईराजस्थान, बिहार, गुवाहाटी अशा सर्वच राज्यांमध्ये पसरले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे.
दरम्यान, धर्मेंद प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे.
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Comments are closed.