मुंबई महापालिकेत विकासाची हंडी लागली जाईल, पापाची हंडी आम्ही फोडली; मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुं

मुंबई : राजधानी मुंबईसह उपनगरातील दहीहंडी (Dahihandi) उत्सवाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील उंचच उंच मनोऱ्यांचे थर पाहायला, सेलिब्रिटींचा डान्स पाहायला गर्दी करतात. तर, सोशल मीडियातूनही मुंबईच्या दहीहंडीचा बोलबोला दिसून येतो. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवात राजकीय पक्षांचाही उत्साह पाहायला मिळत आहे. शिवसेना, मनसे आणि भाजपच्यावतीने यंदा दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा होत आहे. त्यासाठीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फड्नाविस) हे दिवसभरात मुंबईतील (Mumbai) 10 ते 15 दहीहंडी उत्सवांना भेट देणार असून दुपारी 1 वाजता त्यांनी वरळीतील परिवर्तन दहीहंडी उत्सवापासून याची सुरुवात केली. तर, पत्रकारांशी बोलताना यंदा मुंबई महापालिकेत परिवर्तन अटळ असल्याचं त्यांनी म्हटलं.

वरळीतील गोविंदा पथकाने सादर केलेल्या छावा मनोऱ्याचे कौतुक करत मुख्यमंत्र्‍यांनी येथे हंडीही फोडली, त्यानंतर आमदार राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिममधील दहीहंडी उत्सवात सहभागी होत मुख्यमंत्र्‍यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना डिवचलं. यंदा महानगर पालिकेमध्ये परिवर्तन अटळ आहे, महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता तिथे विकासाची हंडी लागली जाईल आणि त्यातील लोणी सर्वसामान्यांना वाटलं जाणार, असे म्हणत मुंबई महापालिका निवडणुकांचे रणशिंग देवेंद्र फडणवीसांनी फुंकले आहे. आत्तापर्यंत महापालिकेतील लोणी कुठे जात होतं तुम्हाला माहिती आहे.  तुम्ही माझ्या तोंडून काढायचा प्रयत्न करताय, पण जनतेला ही माहित आहे ते लोणी कुणी खाल्लं, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. दुसरीकडे मनसे व शिवसेनेच्यावतीनेही मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून ठाण्यात राजन विचारेंकडून निष्ठेची दहीहंडी फोडली जाणार आहे.

दरम्यान, पारंपरिक उत्साहात महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. मुंबईत रात्रीपासून पाऊस पडलाय, आज देखील पावसाचे अंदाज आहेत. तरीही गोविंदांच्या उत्सवाचा पाऊस मोठा आहे, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.

जय जवान पटथकाने 10 थर तयार केले

दरम्यान, मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने 10 थर लावत विक्रम रचला आहे. घाटकोपर येथे मनसेच्या दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने 10 थर रचल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे ठाण्यातील वर्तक नगर येथील प्रो. गोविंदा स्पर्धेतून जय जवान गोविंदा पथकाला बाद ठरवण्यात आले होते. मात्र, आज दहीहंडी दिनी जय जवान पथकाने उंचच उंच मनोरा रचत आपली किमया दाखवून दिली.

हेही वाचा

मुंबईतील सर्वात मोठ्या दहीहंडी मनोऱ्यावर ‘छावा’, कवी कलश अन् संभाजीराजेंचं बलिदान; मुख्यमंत्रीही भावुक

आणखी वाचा

Comments are closed.