मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: दे
देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी: जागतिक आर्थिक संकटामुळे पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना पुढील काही महिने सोने खरेदी टाळण्याचा आणि पेट्रोल-डिझेल व खाद्यतेलाची बचत करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदी (पीएम मोदी) यांच्या या आवाहनानंतर सकारात्मक आणि नकारात्मक अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी साताऱ्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. मोदीजी आपल्याकडून फार मोठी अपेक्षा करत नाहीत. देश संकटात असताना देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. (Maharashtra Politics news)
आज जगभरात मोठं संकट आहे. या संकटाच्या काळात मोदीजींना आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. हा येत्या सहा महिन्यातील शेवटचा मोठा कार्यक्रम असेल. आता मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन आम्ही करणार नाही. मोदीजी जे सांगत आहेत, ते देशहितासाठी सांगत आहेत. आज आपण बघितलं तर जगभरात इंधनाच्या किंमतीमध्ये किती वाढ झाली तर अमेरिकेत 51 टक्के वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22 टक्के वाढ आहे, फ्रान्समध्ये 25 टक्के, जपानमध्ये 35 टक्के, जर्मनीत 27 टक्के, इस्रायल 30 टक्के, दक्षिण कोरियात 30 टक्के, इटलीमध्ये 30 टक्के, सिंगापूरमध्ये 30 टक्के वाढ आहे. पाकिस्तानसारख्या देशात 200 टक्के वाढ आहे. आमच्याकडे मात्र मोदींजींनी मात्र साडेतीन टक्के वाढ केली आहे, हे फडणवीसांनी अधोरेखित केले.
इतके दिवस त्यांनी ही वाढ होऊ दिली नाही. ज्यावेळी देश संकटात असतो, जगावर संकट असतं, तेव्हा माननीय पंतप्रधानांनी काही अपेक्षा व्यक्त केली तर आपण त्या अपेक्षेकृत काम करणं, ही आपली जबाबदारी आहे. बंधू-भगिनींनो आपण देशभक्त आहोत, देशभक्ती ही अशा परिस्थितीत, देशासाठी किती त्याग करु शकतो, यावर अवलंबून असते. फार मोठा त्याग मोदींजींनी अपेक्षित केला नाही. परकीय चलन वाचवण्यासाठी सहा महिने खरेदी करु नका. इंधन जेवढं वाचवता येईल, हे सांगितलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला सांगितलेल्या आहेत. अनिर्बंध पद्धतीने खतांचा वापर करु नका, हे सांगितलं आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. आपण हे करु शकतो. केवळ सहा महिने आपल्याल हे करायचे आहे. सहा महिन्याच जगाची घडी चांगली झाली की या गोष्टी आपल्याला हे करायची आवश्यकता आपल्याला पडणार नाही. प्रत्येक देशभक्त भारतीय आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी सांगितल्यावर आपले मावळे तयार असायचे. अशा या महाराष्ट्रात आपापल्या परीने जे जे शक्य आहे, ते ते आपण करुया, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
आणखी वाचा
Comments are closed.