महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या कफ सिरपचा बीडमध्ये मोठा साठा; 500 बाटल्या जप्त, पुण्यातील एजन


बीड : महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या ‘रेस्पीफ्रेश टीआर’ (Respifresh TR) या कफ सिरपचा मोठा साठा बीड जिल्ह्यातून (Beed News) उघड झाला आहे. परळी, गेवराई, आष्टी आणि बीड (Beed News) शहर या ठिकाणांहून एकूण ५०० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही सिरप यापूर्वी मध्य प्रदेशात २० हून अधिक लहान मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर महाराष्ट्रातही या औषधावर बंदी घालण्यात आली होती. मात्र बंदीनंतरही या औषधाचा साठा जिल्ह्यात पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्यातील एका एजन्सीकडून या सिरपचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून देण्यात आली. सध्या या सिरपचा साठा कोणत्या मेडिकलपर्यंत पोहोचला होता, याचा शोध घेण्याचं काम सुरू असून, सर्व साठा तातडीने मागवून नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रकरणी कारवाई केली असून संबंधित औषध पुरवठादार आणि वितरकांविरुद्ध चौकशी सुरू आहे.(Respifresh TR)

महाराष्ट्र कोल्ड्रिफ बंदी: कोल्डिप सिरपॉल बांदी ते महाराष्ट्र

मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यातील कफ सिरप औषधाच्या वापरामुळे बालकांच्या मृत्यू प्रकरणानंतर आता राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. राज्यात कोल्ड्रिप सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. एप्रिल 2017 ते मे 2025 या कालावधीतील कोल्ड्रिप सिरप मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) एफडीएने (FDA) रेस्पिफ्रेश टीआर (Respifresh TR) आणि रीलाइफ कफ सिरप (Relife Cough Syrup) यामध्ये सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक विषारी डायएथिलीन ग्लायकॉल (DEG) असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विक्री, वितरण आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सर्व औषध परवानाधारकांना साठ्याची माहिती तात्काळ द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

Tamilnadu Cough Syrup News : तमिळनाडूमध्ये फॅक्टरीचा परवाना निलंबित

तमिळनाडू (Tamil Nadu) सरकारच्या चौकशीत कांचीपुरम येथील श्रीसेन फार्मास्युटिकल (Shrisen Pharmaceutical) या कंपनीबाबत मोठे खुलासे झाले आहेत. 44 पानांच्या अहवालात 325 मोठ्या आणि 39 गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. कंपनीने गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचे (GMP) पालन केले नाही आणि नॉन-फार्मास्युटिकल दर्जाच्या प्रोपलीन ग्लायकॉलचा वापर करून सिरप तयार केला. या केमिकलमध्ये 48.6 टक्के डायएथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉल आढळले, जे मानवासाठी अत्यंत विषारी ठरतात. औषध निर्मिती अत्यंत अस्वच्छ, कीटकयुक्त आणि गंधयुक्त वातावरणात होत असल्याचेही चौकशीत दिसून आले. त्यानंतर तमिळनाडू सरकारने फॅक्टरीचा परवाना तत्काळ प्रभावाने रद्द केला.

आणखी वाचा

Comments are closed.