टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, काँगेसची मागणी
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता इथेनॉल स्कँडल प्रकरणी टोलकरी नितीन गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वसामान्यांना इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल देऊन गाडय़ांची वाट लावली आणि दुसरीकडे इथेनॉल निर्मिती कंपनीने मात्र वारेमाप पैसा कमावला, असा गंभीर आरोप केला. नितीन गडकरी यांनी एकीकडे भ्रष्टाचार केला आणि दुसरीकडे देशातील नागरिकांना छळले. गडकरी हे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधीलच एक मंत्री असल्यामुळे त्यांनी इथेनॉलमुळे ज्यांच्या वाहनांचे नुकसान झाले त्या नागरिकांची माफी मागावी आणि गडकरींचा राजीनामा घ्यावा, असे सपकाळ म्हणाले.
Comments are closed.