‘कॉक्रोच जनता पार्टी’चं अकाऊंट ब्लॉक करण्यामागे ‘IB’ चा हात, गोपनीय अहवालानंतर PM मोदींनीच…;

झुरळ जनता पार्टी: देशात सध्या वाढता असंतोष आणि जनक्षोभ दडपण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू असल्याचा थेट आरोप काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (Cockroach Janta Party) सोशल मीडिया अकाऊंट (Social Media Account) ब्लॉक आणि हॅक (Hack) करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा म्हणजेच ‘आयबी’चा (Intelligence Bureau – IB) हात असल्याचा खळबळजनक दावा पटोले यांनी केला असून, यावरून त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे.

Nana Patole: ‘कॉक्रोच जनता पार्टी’चं अकाऊंट ब्लॉक करण्यामागे ‘IB’ चा हात

नाना पटोले म्हणाले की, देशातील वाढत्या जनक्षोभाची (Public Outrage) माहिती ‘आयबी’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली होती. देशातील हा जनतेचा उद्रेक जर वेळीच रोखला नाही, तर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा या अहवालात (Report) देण्यात आला होता. ‘आयबी’ने केंद्र सरकारला दिलेल्या याच गोपनीय अहवालानंतर (Confidential Report) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हे अकाउंट हॅक केल्याचा दावा पटोलेंनी केलाय.

नाना पटोले वर पंतप्रधान नरेंद्र मोदी: “अकाऊंट्स बंद करून जनतेचा आवाज दाबू शकत नाही”

सोशल मीडियावरील अकाऊंट्स बंद करून किंवा त्यावर बंदी आणून सरकार जनतेचा आवाज दाबू शकत नाही, असा इशारा नाना पटोले यांनी केंद्र सरकारला दिला आहे. ते पुढे म्हणाले, “पंतप्रधानांनी केवळ विरोधकांचे सोशल मीडिया अकाऊंट्स ब्लॉक करण्यापेक्षा ‘आयबी’ला देशातील वास्तविक परिस्थिती विचारली पाहिजे. आज देशातील शेतकरी, तरुण, गरीब आणि बेरोजगार यांच्यात केंद्र सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. हा जनक्षोभाचा उद्रेक आता कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकतो,” असे देखील त्यांनी म्हटले.

Nana Patole on Devendra Fadnavis: नाना पटोलेंची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वाचवा, असं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वंदे भारत ट्रेनने मुंबईवरून शिर्डीला गेलेत. या त्यांच्या दौऱ्यावर काँग्रेस नेते नाना पाटोले यांनी सडकून टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस हे लोकांना मूर्ख बनवण्यासाठी आणि रील तयार करण्यासाठी असा दौरा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयापासून विधानभवनापर्यंत मोटरसायकलनं प्रवास केला होता. त्यावरून टोला लगावताना पटोले म्हणाले, तो प्रवास केवळ एक रील बनवण्यासाठी होता. त्यानंतर ते रोज काही मोटरसायकलनं फिरत नाहीत, तर आपल्या मोठ्या ताफ्यासह प्रवास करतात. फडणवीस मुंबईवरून शिर्डीला वंदे भारत एक्सप्रेस गेले. तिथून पुढे ते रस्ते मार्गाने नागपूरला येणार आहेत. जर ते रस्ते मार्गाने प्रवास करणार असतील, तर त्यांच्या ताफ्यात प्रत्येक जिल्ह्यातील सुरक्षा गाड्या सामील होतील. या दौऱ्यात एकूण किती डिझेल जळणार आणि सरकारी पैशांचा किती अपव्यय होणार? याचा हिशोब फडणवीसांनी जनतेला दिला पाहिजे, असं आवाहन पटोले यांनी केलं.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

कधी बुलेटसवारी, कधी वंदे भारतने प्रवास; नरेंद्र मोदींच्या आवाहनास मुख्यमंत्री देवाभाऊंचा असाही प्रतिसाद

आणखी वाचा

Comments are closed.