रायगडमध्ये सुरुंग लावताच सुनील तटकरेंना काँग्रेस नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, तिसऱ्यांदा खासदार
रायगाद बातम्या: रायगड जिल्ह्यातील अलिबाग मतदारसंघाचे माजी आमदार मधूशेठ ठाकूर यांचे चिरंजीव व काँग्रेस नेते अॅड. प्रवीण ठाकूर यांनी शनिवारी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे अलिबाग व रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर काँग्रेसला अलिबागमधून खासदार सुनील तटकरे यांनी सुरुंग लावल्यानंतर काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी आज अलिबाग सातीर्जे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेत रणशिंग फुंकले आहे.
राजाभाऊ ठाकूर यांचे सख्खे बंधू आणि महाराष्ट्र काँग्रेसचे चिटणीस यांचा नुकताच अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला. त्यानंतर काँग्रेस संघटना मजबुतीसाठी प्रवीण ठाकूर यांचे बंधू राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आगेकूच केली आहे.
सुनील तटकरे यांना तिसऱ्यांदा खासदार होऊ देणार नाही
सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे कधीच पोट भरले नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरत गोगावलेच दावेदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राजाभाऊ ठाकूर यांनी खासदार सुनील तटकरेंवर केली आहे. सुनील तटकरे यांना तिसऱ्यांदा खासदार होऊ देणार नाही, असा इशारा देखील राजाभाऊ ठाकूर यांनी दिला आहे. तसेच, काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते आता जिद्दीने पेटून उठलेत. पक्ष वाढीसाठी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी जोमाने कामाला लागलीय. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस मोठी उभारी घेणार आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
राजीव साबळे यांचाही अजित पवार गटात प्रवेश
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते राजीव साबळे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक पातळीवर प्रभावशाली आणि लोकप्रिय नेत्यांपैकी एक मानले जाणारे साबळे हे चार वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा ठसा आहे. शिवसेनेच्या विचारधारेशी निष्ठा राखत त्यांनी अनेक वर्षे सक्रिय कामगिरी केली. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माणगाव तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माणगाव-श्रीवर्धन मतदारसंघात सध्या शिवसेनेचा प्रभाव असला तरी राजीव साबळे यांच्या आगमनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक स्तरावर मोठा पाठिंबा मिळू शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश ‘गेमचेंजर’ ठरू शकतो, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. या राजकीय घडामोडीमुळे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.