आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; बडगुजरांसाठी दाऊदने शिफारस केली का? काँग्रेस प्

सुधाकर बॅडगुझरवरील हर्षवर्धन सपकल: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी (दि. 17) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीपासूनच भाजपने सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली होती. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी करत नाचतानाचा बडगुजर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विधीमंडळात भाजप आमदार नितेश राणे यांनी ते फोटो आणि व्हिडीओ दाखवून बडगुजर यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. मात्र, आता सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सलीम कुत्ता प्रकरणाचा धागा पकडत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

बडगुजरांना पक्षात घेण्यासाठी दाऊदने शिफारस केली होती का?

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हाताच्या कंगणाला आरसा कशाला? ⁠पहिले इकबाल मिर्ची गोड करुन घेतली. ⁠आता कुत्ताशी सोयरीक केली. बडगुजर यांना पक्षात घेण्यासाठी दाऊदने शिफारस केली होती का? दाऊदची बेनामी संपत्ती आता भाजपच्या लोकांना द्यायची आहे का? तिथे त्यांना भाजपच कार्यालय सुरू करायचं आहे का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेवर भाजप काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोण आहेत सुधाकर बडगुजर?

सुधाकर बडगुजर हे शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. त्यांची राजकीय कारकीर्द 2007 साली नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून सुरू झाली. त्या वेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि 2008 साली अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला. 2009 ते 2012 या कालावधीत, बडगुजर यांनी नाशिक महापालिकेचे सभागृहनेते म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 2012 ते 2015 दरम्यान, ते महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये, त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवली, मात्र दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेते पदावर नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्यावर काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोप असल्याची माहितीही समोर आली आहे. मंगळवारी (दि.17) त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Sudhakar Badgujar : भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.