शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा मोबाईल विक्रेत्याला दणका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बिघडलेला टीव्ही बदलून मिळावा यासाठी तीन महिन्यांपासून दुकानाच्या फेऱ्या मारणाऱ्या महिलेला ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी न्याय मिळवून दिला आहे. महेश्वरी गावडे असे या महिलेचे नाव असून तिने अंधेरी पूर्वेतील के. वन कम्युनिकेशन या दुकानातून मोबाईल खरेदी केला होता. त्यावेळी तिला बक्षीस स्वरूपात मिळालेला टीव्ही दोन महिन्यांतच बंद पडला. तिने याबाबत विचारणा केली असता दुकानदाराने उडवाउडवीची उत्तर देत तिला हुसकावून लावले. अखेर महिलेने शाखा क्रमांक 80 चे शाखाप्रमुख विनोद चौधरी यांच्याकडे धाव घेत तक्रार नोंदवली असता त्यांनी ग्राहक संरक्षण कक्ष पदाधिकाऱयांच्या मदतीने पाठपुरावा करून तिला नवीन टीव्ही मिळवून दिला.

ग्राहक संरक्षण कक्षाच्या अंधेरी पूर्व विधानसभा संघटक राम साळवी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पदाधिकाऱयांसह मोबाईल दुकानावर धडक देत मालक निखिल यांना जाब विचारला. अखेर दोन दिवसांनंतर दुकानदाराने साळवी यांना नवीन टीव्ही घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार आज महेश्वरी गावडे व त्यांच्या वडिलांना नवीन टीव्ही सुपूर्द करण्यात आला. यावेळी राम साळवी यांच्यासह विलेपार्ले कक्ष विधानसभा संघटक संतोष कदम, विधानसभा कार्यालय चिटणीस देवेंद्र भोसले, विधानसभा कक्ष प्रसारक सत्यवान पवार, उप कक्ष संघटक गणेश आढाव, कक्ष उपसंघटक मंगेश तेरवणकर, कक्ष वॉर्ड संघटक विलास सुर्वे आदी उपस्थित होते.

Comments are closed.