संतापजनक! ठाण्यातल्या 16 वर्षीय मुलीचं अपहरण करून अकोल्याच्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार
गुन्हेगारीच्या बातम्या: राज्यात लैंगिक छळ,बलात्कार,अत्याचाराच्या वारंवार समोर येणाऱ्या घटना ताज्या असताना ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे . ठाण्यातल्या 16 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला अकोल्याला घेऊन जात असताना ट्रेनमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीस अकोला स्टेशनवर टाकून तो घरी परतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे . यानंतर 20 वर्षीय तरुणाच्या विरोधात पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अकोला रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुलीला स्टेशनवर पाहिले .तिच्याकडे चौकशी केल्यानंतर घडला प्रकार समोर आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने PTI या वृत्तसंस्थेला दिली.
नेमके प्रकरण काय?
राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका सोळा वर्षीय मुलीचा अपहरण करून तिला अकोल्याला घेऊन जाताना ट्रेनमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केलाय .ही मुलगी डोंबिवली परिसरातील मानपाडा येथील आडिवली रहिवासी आहे. 20 वर्षीय आरोपीने पीडित मुलीला ट्रेनने अकोला येथे नेले .वाटेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला .
अकोल्यातील आरोपीच्या पालकांनी त्याला आणि मुलीला त्यांच्या घरात येऊ दिलं नाही .त्यामुळे मुलाने पीडित मुलीला अकोला रेल्वे स्थानकावर सोडून दिले .व नंतर तो घरी परतला असे कल्याण येथील सरकारी रेल्वे पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सोमवारी PTI ला सांगितले . अकोल्यातील रेल्वे पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण त्यांच्या समकक्षांकडे वर्ग केले आहे .त्यानंतर कल्याण रेल्वे प्रशासनाने आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64,कलम 74, तसेच विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला व गुन्हेगारी बळाचा वापर तसेच 137 कलमांतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे.पोक्सो कायद्याच्या तरतुदीनुसार आरोपीवर एफआयआर दाखल केला .इतर आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं .
मुल गेलं, शरिरसंबंधासाठी दबाव, घर सोडून गेली पण ट्रेनमध्ये घात झाला
हरियाणातील पानिपतमध्ये एका महिलेवरील क्रूरतेची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पानिपतमध्ये स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तीन जणांनी एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कार झालेल्या महिलेने तिच्यावर झालेल्या क्रूरतेची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर ती मानसिक तणावाखाली गेली होती. 24 जून रोजी तिचा नवरा तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. जबरदस्ती करत होता, त्यावेळीतिने नकार दिल्यावर नवऱ्याने तिला मारहाण केली. तसेच तिला तिच्यावर बाहेर बलात्कार केला जाईल असंही त्याने म्हटलं होतं.
आणखी वाचा
Comments are closed.