कागदावर लिहून ठेवला मोबाईलचा पासवर्ड अन् गळ्याला लावली दोर; निवासी युवा डॉक्टरने वसतिगृहात संपव
पुणे: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच सोलापुरातील एका शिकाऊ डॉक्टराने वसतीगृहात आत्महत्या केल्याची घटना गडली. हात व गळा चिरून घेऊन या युवा डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. या दोन घटनानंतर आता पुण्यात एका निवासी डॉक्टराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर श्याम व्होरा (वय 28) यांनी राहत असलेल्या डॉक्टर्स हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (रविवारी) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, रुबी हॉल क्लिनिकपासून 300 मीटर अंतरावर असलेल्या ढोले पाटील चौकात दामोदर भवन ही इमारत असून याच इमारतीत डॉक्टरांचे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये जवळपास 80 ते 100 डॉक्टर राहतात. रूमचा दरवाजा खूप वेळ बंद असल्याने सुरक्षा रक्षकाला शंका आल्याने त्याने तो तोडला. यानंतर डॉ. श्याम व्होरा यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर श्याम व्होरा (वय 28) यांच्या आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नव्हते.
कागदावर लिहला मोबाइलचा पासवर्ड
डॉ. श्याम व्होरा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका कागदावरती आपल्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवलेला आढळून आला आहे. यामुळे या आत्महत्येचे गूढ कायम लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. डॉ. व्होरा हे रुबी रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी वैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. ते मुळचे गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर व्होरा यांचे कुटुंबीय गुजरातहून पुण्याला निघाले. ‘आमच्या परवानगीशिवाय काहीच करू नका’ असे त्यांनी पोलिसांना कळवले आहे. यामुळे डॉ. व्होरा यांचे पार्थिव रुबी रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे.
हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील एका शिकाऊ डॉक्टराने वसतीगृहात आत्महत्या केल्याची घटना एप्रिल महिन्यामध्ये समोर आली होती. हात व गळा चिरून घेऊन या युवा डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य नामबियर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव होते. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या डॉक्टरांच्या वसतीगृहातच तो राहत होता. हात व गळा चिरून या डॉक्टराने आत्महत्या केली होती. 2019च्या शासकीय मेडिकल कॉलेजचा हा विद्यार्थी असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा देत होता.
आणखी वाचा
Comments are closed.