मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या

मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबी कारवाईचा धडका सुरू केला असून महसूल, प्रशासन आणि पोलीस खात्यातही धाडी टाकत अनेकांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. मुंबईतही काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकाऱ्यास लाच घेताना अटक केली होती. आता, पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत खार पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तुषार काळे यांना लाच (Bribe) घेताना रंगेहात अटक केली. या घटनेमुळे मुंबईच्या (Mumbai) पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस खात्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

एका प्रॉपर्टी प्रकरणात चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी तुषार काळे याने 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी संबंधिताकडे केली होती. त्यानुसार, ठरवल्याप्रमाणे तुषार काळे यास दीड लाख रुपयांचा पहिला हफ्ता देत असताना ACB ने रंगेहात अटक केली. मुंबईतील वांद्रे न्यायालयात हे प्रकरण होते, त्याची चौकशी करण्यासाठी तुषार काळे याला सांगण्यात आले होते. मात्र, याप्रकरणी तक्रारदाराच्या बाजुने अहवाल देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार आणि एबीसीच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव फसला अन् तो जाळ्यात अडकला.

हेही वाचा

मोठी बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

आणखी वाचा

Comments are closed.