अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा हादरवणारी माहिती, 3 FIR मधून उलगडली विकृतीची कहाणी
अशोक खरात गुन्हा : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवे धक्कादायक आणि राज्याला हादरवणारे खुलासे समोर येत आहे. दरम्यान आता या प्रकरणाच्या तपासात्यामुळे एसआयटीसह (विशेष तपास पथक) आयकर विभागानेही यात एन्ट्री घेतली असून, खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला आहे. आधीच गंभीर आरोपांना सामोरे जात असलेल्या खरातविरोधात आत आणखी तीन पीडित महिलांनी पुढे येत तक्रार नोंदवल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून भोंदू अशोक खरात गुन्हा पॅटर्नची काळी कुंडली समोर आली आहे. दरम्यान भोंदू बाबा अशोक खरातवर आता पर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहे. या तिन्ही लैंगिक अत्याचाराप्रकरणी गुन्ह्यातील महत्वाचे मुद्दे काय? हे आपण जाणून घेऊ.
Ashok Kharat Crime : लैंगिक अत्याचारासह महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांर्गत गुन्हे
मिळलेल्या माहितीनुसारनाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातवर तीन लैंगिक अत्याचारासह महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक, अघोरी प्रथा कलमांर्गत गुन्हे दाखल आहे. पहिल्या गुन्ह्यात अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचार, जादूटोणा आणि जीवे मारण्याची धमकी अशा कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
दुसऱ्या गुन्ह्यात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल असून यात अतिशय निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत घटस्फोटीत विवाहितेवर तांत्रिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण करण्यात आले. महिलेला भीती घालत मुलांचे बरे वाईट होईल असे सांगून वारंवार मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे असे सांगून लैंगिक अत्याचार केले. आणि महिलेचा गर्भपात देखील केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
पहिला गुन्हा
– पीडित महिलेवर 2022 ते 2025 या कालावधीमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले.
– भोंदूगिरी करणाऱ्या खरातने दैवी शक्ती असल्याचा खोटा बनाव केला.
– खरातने महिलेला कार्यालयात बोलावून धार्मिक विश्वासाचा फायदा घेत गुंगीकारक औषध दिलं.
– मी कृष्णाचा अवतार तू मागच्या जन्मातील माझी राधा असे सांगून महिलाना भुरळ घालत
– डोक्यावर लोटा, तांब्या ठेवून कानात पुटपुटत
– महिलेने वाच्चाता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत
– वारंवार भीती घालत महिलेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करत
– खोटे मंत्र, तंत्र आणि अघोरी पूजाविधी करण्यास सांगून लैंगिक अत्याचार करत.
– महिलांना गायत्री मंत्र म्हणण्याला सांगून महिलांचा शोषण करत
– महिलेला कार्यालयात बोलवत सोबत आलेल्या पतीला बाहेर बसवून धानस्थ ठेवत
दुसरा गुन्हा.
– महिला गर्भवती असताना मुलगा होण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार
– गरोदरपणात पूजाविधी करायची सांगत अत्याचार.
– पीडित महिलेला धमकी देऊन कुटुंबाला ठार मारण्याची धमकी चा फिर्यादीत उल्लेख
– गरोदर महिला असताना नकली साप आणि नकली वाघाचे कातडी दाखवून अघोरी कृत्य करत
– महिलेला गरोदरपणात पूजाविधी सांगून कानात काहीतरी मंत्रउच्चार करून धार्मिक भावना निर्माण करत
– लैंगिक अत्याचारासह नवऱ्याला जीवे ठार मारेल अशी धमकी दिल्याची तक्रार
तिसरा गुन्हा
– लग्न ठरलेल्या व्यक्तीसोबत आयुष्यात शुभ काळ येईल असा विश्वास देत अत्याचार
– संसारात वाद विवाद होत असल्याने महिलेसोबत अश्लील कृत्य
– महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर लैंगिक अत्याचार
– घटस्फोट महिलेस लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक लाभ देण्याचे आमिष
– महिला गर्भवती झाल्यानंतर गर्भपात करण्यासाठी औषध दिलं
– तांत्रिक विधीसह अघोरी पूजाविधी करून मुलाचे बरे वाईट होईल असे म्हणत धमकी
– लग्नाचे आमिष दाखवून अवतारी पुरुष असल्याचा खोटा बनाव
– त्रिकाळ ज्ञान असल्याचे सांगत विश्वास संपादन करून महिलेस तू मागील जन्मात अप्सरा असल्याचे भासवत.
– तुझा घटस्पोट तुझा लिखित होता मी तुझ्याशी लग्न करतो तुझ्या मुलांचा सांभाळ करतो असे सांगून वारंवार लैंगिक अत्याचार
आणखी वाचा
Comments are closed.