अशोक खरातची SIT कडून सलग 49 दिवस चौकशी; 105 साक्षीदारांचे जबाब आणि 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल

अशोक खरात प्रकरण: नाशिकचा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या विरोधात विशेष तपास पथकाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून खरातच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. अशोक खरात विरोधात दाखल झालेल्या एकूण गुन्हा पैकी 9 गुन्ह्याचा एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे, त्यातील महिला अत्याचार प्रकरणातील दोन गुन्ह्याचे दोषारोप पत्र दाखल झाले आहे, एका गुन्ह्यात 750 आणि दुसऱ्या गुन्ह्यात साधारणपणे 450 जवळपास 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल झाले आहे, उर्वरित गुन्ह्याचे दोषरोप पत्र लवकरच दाखल केले जाणार आहे.

सलग 49 दिवस एसआयटीने अशोक खरातची चौकशी, 105 साक्षीदारांचे जाबजबाब- (Ashok Kharat Case)

सलग 49 दिवस एसआयटीने अशोक खरातची चौकशी केली असून 105 साक्षीदारांचे जाबजबाब नोंदनविण्यात आले आहे, अशोक खरातच्या घरी, कार्यलयात, फार्म हाऊसवर छापा मारून अनेक पुरावे जप्त करण्यात आले आहे, इलेक्ट्रॉनिक, पुरावे,कागदपत्रे यासह इतर पुराव्याचा यात सहभाग आहे. साक्षीदारांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरात हा ईशानेश्वर मंदिर परिसरात हातचलाखीने स्वतःकडे दैवीशक्ती असल्याचे भासवून भाविकांच्या कुटुंबावर मृत्यूचे सावट असल्याचे सांगून, भीती दाखवून तो खडे, चिंचुके आणि रुद्राक्ष देऊन पुजेच्या नावाखाली लाखो रुपये उकळले आहेत. तर, पीडित महिलांना बदनामीची धमकी देत त्याने त्यांचे लैंगिक शोषण केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. सराफा व्यावसायिक, डॉक्टरसह अनेकांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्हा एकुन १७ गुन्हे दाखल- (अशोक खरात प्रकरण)

दैवी शक्तीचा बनाव रचून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि  आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात नाशिक शहर , ग्रामीणसह अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 17 गुन्हे दाखल झाले आहेत. या पैकी 9 गुन्ह्याचा तपास एसआयटी, प्रत्येकी 3 गुन्ह्याचा तापस नाशिक शहर आणि अहिल्यानगर पोलीस तर उर्वरित 2 गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत. खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी 24 जणांचे एसआयटी पथक नियुक्त करण्यात आले होते. 20 मार्च 2026 पासून या प्रकरणाचा तपास एसआयटी करीत आहे.

एसआयटीच्या पथकात एकूण 24 जणांचा समावेश- (Ashok Kharat Case)

आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीच्या पथकात 2 पोलीस उपअधीक्षक, 3 पोलीस निरीक्षक, 3 सहायक पोलीस निरीक्षक 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असा एकूण 24 जणांचा समावेश आहे. एसआयटीकडे असलेल्या एकूण 11 गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत. एक फसवणुकीचा तर दोन गुन्हे  खरात यानेच साक्षीदारांविरोधात बनावट गुन्हे  दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातमी:

Rupali Chakankar ED Inquiry : दोन दिवसांआधी SIT चौकशी; आज रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स, भोंदू अशोक खरात प्रकरणी मोठी घडामोड

आणखी वाचा

Comments are closed.